Chiku Lagavad 2024 चिकू या पिकाचे उगम स्थान मेक्सिको या देशात झाली असून तेथून त्याचा प्रसार मध्य अमेरिका फ्लोरिडा श्रीलंका फिलिपाईन्स आणि भारत इत्यादी देशांमध्ये होत गेला. आज आपण आपल्या या लेखांमध्ये चिकू लागवड कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हालाही चिकूची लागवड करायची असेल तर, चिकू लागवड कशी करावी याबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपला लेख शेवटपर्यंत वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
चिकू लागवड : Chiku Lagavad 2024
चिकू या पिकाचे उगमस्थान मेक्सिको या देशांमध्ये झाला पासून तेथून त्याचा प्रसार मध्य अमेरिका आणि भारत इत्यादी देशांमध्ये होत गेला. भारतामध्ये चिकू ची पहिली बाग लागवड महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामधील घोलवड या गावे 1898 मध्ये घेण्यात आली होती. महाराष्ट्र गुजरात तमिळनाडू या राज्यांमध्ये चिकूची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. चिकू हे अतिशय घातक पीक असून महाराष्ट्र मधील सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक घेता येऊ शकते. दरवर्षी चिकू या पिकांमध्ये बहार हमखास असतो. इतर फळ झाडांच्या तुलनेत चिकू वरती रोग आणि किड्यांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी प्रमाणात होत असलेला पाहायला मिळतो. चिकू हे कमी पाण्यावरती येणारे पीक आहे. म्हणूनच तुलनेने कमी निगा राखून या पिकाच्या लागवडीस महाराष्ट्र मध्ये भरपूर वाव असल्याचे सर्वत्र पाहायला मिळते. काही वर्षांमध्येच चिकू हे एक प्रमुख म्हणून निश्चितच लोकप्रिय झालेले असेल.
चिकू पिकाचे उगमस्थान ,महत्व ,भौगोलिक प्रसार :Chiku Lagavad 2024
Chiku Lagavad 2024सर्वप्रथम चिकू या पिकाचे उगमस्थान मेक्सिको या देशांमध्ये झालेले पाहायला मिळते. यानंतर चिकू पिकाचा प्रसार मध्य अमेरिका, फ्लोरिडा, श्रीलंका, आणि फिलिपाईन्स, तसेच भारत इत्यादी देशांमध्ये झालेला पाहायला मिळतो. भारतामध्ये चिकू या पिकाचा प्रवेश केव्हा झाला याबद्दल काही माहिती नाही परंतु, चिकू हे फळ भारतामध्ये आता चांगलेच ठरवलेले आहे.
हवामान आणि जमिनीच्या बाबतीमध्ये चिकू हे पीक विशेष चोखंदळ नाही. महाराष्ट्र मध्ये सर्वच भागांमध्ये या झाडांची लागवड निफायदेशीर होण्यास मदत होऊ शकते. चिकूचे झाड हे खूप काटक असते आणि कमीत कमी पाण्यावर सुद्धा चिकूचे झाड जगू शकते. विशेषतः चिकू पिकावर घातक असे रोग किंवा किडे जास्त प्रमाणात पडत नाहीत . त्यामुळे चिकू पिकासाठी खास कोणत्याही उपाययोजना न करता दरवर्षी जास्त प्रमाणात बहर येत असल्यामुळे चिकूची लागवड महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये वाढत चालले आहे. इतर फळ झाडांच्या तुलनेमध्ये कमीत कमी श्रमात अधिक उत्पादन देणारे चिकू हे फळ पीक आहे.
Chiku Lagavad 2024चिकू पिकाला वर्षभर फुले आणि फळे येत असतात. ताजी पिकलेली चिकूची फळे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरतात. तसेच आईस्क्रीम ,फ्रुट सॅलड, , यामध्ये चिकू पिकाच्या गराचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. चिकू पिकाची साल पातळ असून फळे गोड असतात. चिकूच्या एकूण फळांमध्ये दोन ते चार बिया असतात. चिकू पिकाच्या फळांच्या प्रत्यक्ष शंभर ग्रॅम खाण्यासाठी भागात तात्काळ एकूण होणारे कार्बोहायड्रेटिव्ह आणि योग्य भाग्यांचे भरपूर प्रमाणात असल्यामुळे मानवी शरीराला अत्यंत पोषक असते, यामधून भरपूर प्रमाणात उष्मांक सुद्धा मिळतात. चिकू फळाच्या प्रत्यक्ष शंभर ग्राम खाणे योग्य भागात खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे अन्नद्रव्य असतात.
अन्नघटक | प्रमाण ( % ) |
पाणी | 74.00 |
कार्बोहायड्रेट्स | 21.40 |
प्रोटीन्स | 0.70 |
खनिज द्रव्य | 0.50 |
लोह | 0.02 |
चुना | 0.03 |
कॅरोटीन | 0.10 |
थायमिन | 0.02 |
रिबोप्लेविन | 0.03 |
जीवनसत्व ब | 6.00 |
जीवनसत्व क | 6.00 |
स्निग्ध पदार्थ | 1.10 |
स्फुरद | 0.03 |
चिकू पिकाचे उगमस्थान दक्षिण मेक्सिको या देशात झाले असून तेथून त्याचा प्रसार फिलिपाईन्स इंडोनेशिया फ्लोरिडा श्रीलंका भारत आणि बांगलादेशमध्ये होत गेला. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील घोलवड या गावांमध्ये 1898 मध्ये लावण्यात आली होती. यानंतर चिकू फळाचा प्रसार इतर राज्यांमध्ये होत गेला.
चिकू पिकाचे लागवड क्षेत्र : Chiku Lagavad 2024
आकडेवारीनुसार भारतात चिकू पिकाखाली 25000 हेक्टर क्षेत्र आहे. यानुसार कर्नाटक राज्याचा चिकू लागवड मध्ये क्षेत्र आणि उत्पादकाच्या तुलनेमध्ये प्रथम क्रमांक लागतो. चिकू उत्पादन घेणारे प्रमुख राज्य आणि क्षेत्र व उत्पादकता खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे.
उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये चिकू खालील क्षेत्र अंदाजे 5,000 एकर असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्र मधील सर्वच भागांमध्ये चिकूचे पीक घेतले जात असेल विभागावरती क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत.
विभाग | क्षेत्र ( हेक्टर ) |
कोकण | 2,850 |
नाशिक | 250 |
पुणे | 800 |
अहमदनगर | 700 |
कोल्हापूर | 100 |
छत्रपती संभाजी नगर | 100 |
लातूर | 50 |
अमरावती | 50 |
नागपूर | 50 |
इतर | 50 |
एकूण | 5,000 |
Chiku Lagavad 2024चिकू लागवड क्षेत्रामध्ये सण 1990 पासून मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबागा लागवड कार्यक्रमांमध्ये या पिकांचा समावेश केला गेला होता. तसेच अभिवृत्ती तंत्रात सुधारणा झाल्यामुळे चिकू लागवडीस जास्त वेग आलेला आहे.
चिकू पिकासाठी योग्य हवामान आणि जमीन :Chiku Lagavad 2024
Chiku Lagavad 2024महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये चिकूची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते. उष्ण प्रदेशातील या फळ पिकाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. चिकू पिकाच्या फुलोराच्या काळात तापमान 43 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास फुलोरा गळतो , तसेच किमान तापमान सेल्सियस पेक्षा कमी असल्यास झाडाची वाढ खुंटते. अशा परिस्थितीमध्ये लहान झाडांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात उन्हाळ्यामध्ये चिकूच्या पिकाला जास्त प्रमाणात पाणी द्यावे लागते. कमी पावसाच्या प्रदेशांमध्ये चिकूच्या बागेला पाण्याच्या पाळ्या वाढवून लागवड केली जाते.
चिकूच्या पिकाला सर्वच प्रकारचे जमीन मानवते. नदीकाठची गाळवट पोयट्याची समुद्र किनाऱ्याजवळील जमीन अधिक चांगले असते. भारी जमिनीमध्ये नेचर यासाठी जर काढून चिकूची लागवड करावे. पाणथळ भागांमध्ये किंवा जमिनीमध्ये एक ते एक पॉईंट पाच मीटर च्या खाली असलेल्या भागांमध्ये अथवा अति हलक्या उथळ जमिनीमध्ये चिकू पिकाची चांगल्या प्रकारे होत नाही. पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे नाही झालं तर आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असले तर जमिनीमध्ये चिकू लागवड करू नये.Chiku Lagavad 2024
फळबाग लागवड अनुदानासाठी महाडीबीटी वेबसाईटला भेट द्या :
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
चिकूच्या सुधारित जाती
Chiku Lagavad 2024 महाराष्ट्र मधील चिकूच्या कालीपत्ती व क्रिकेट बॉल प्रमुख जाती लागवडीसाठी घेतल्या जातात. कालीपत्ती : या जातीच्या झाडांची पाने गडद हिरव्या रंगाची असून रुंद असतात. व ही झाडे पसरत वाढतात. या जातीची फळे मोठी अंडाकृती आणि भरपूर गरयुक्त असतात. फळांचा घर आणि गोड असतो. या फळांमध्ये बियांचे प्रमाण सुद्धा कमी असते प्रत्येक फळांमध्ये दोन ते चार इतक्या बिया असतात. या फळाची साल सुद्धा पातळ असते. महाराष्ट्र मध्ये ह्या जातीच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात शिफारस केले जाते.
क्रिकेट बॉल
Chiku Lagavad 2024 या जातीच्या झाडांची पाने गडद हिरव्या रंगाची असतात. ही फळे आकाराने मोठी असतात. परंतु फळांचा गर जास्त कमी गोड असतो. या जातीच्या फळांची प्रत मध्यम प्रकारचे असून उत्पादन कमी प्रमाणात येते.
चिकू पिकाच्या कलमांची निवड आणि लागवड पद्धत
- डोळकाडे यासारख्या झाडेच्या
- कलम सरळ वाढलेले आणि त्यावर ते भरपूर निरोगी पाने असावेत
- कलम केलेला भाग हा एकरूप असायला हवा. कलमांची उंची अर्धा मीटर असणे गरजेचे आहे.
- खुंटावरती कलम खेळणी केलेल्या असावे. मोहाच्या रोपावरती चिकूची कलमे खरेदी करू नये
- कलमे स्वतः तयार केलेली अथवा शासकीय किंवा कृषी विद्यापीठाच्या मान्यता प्राप्त नामांकित रोपवाटिकेमधील वापरावीत.
शेतामध्ये कांदा लागवड करायची आहे ? कांदा लागवड विषयी संपूर्ण माहिती
चिकू पिकाची लागवड कशी करावी याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Maharashtra Cha Annadata
FAQ
चिकू पिकासाठी योग्य हवामान व जमीन कशाप्रकारे असावे लागते ?
उष्ण प्रदेशातील या फळ पिकाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. चिकूच्या पिकाला सर्वच प्रकारचे जमीन मानवते. नदीकाठची गाळवट पोयट्याची समुद्र किनाऱ्याजवळील जमीन अधिक चांगले असते
चिकू फळाच्या सुधारित जाती कोणत्या आहेत ?
महाराष्ट्र मधील चिकूच्या कालीपत्ती व क्रिकेट बॉल प्रमुख जाती लागवडीसाठी घेतल्या जातात.
चिकू पिकाचा उगम कोणत्या देशामध्ये झाला ?
चिकू पिकाचे उगमस्थान दक्षिण मेक्सिको या देशात झाले असून तेथून त्याचा प्रसार फिलिपाईन्स इंडोनेशिया फ्लोरिडा श्रीलंका भारत आणि बांगलादेशमध्ये होत गेला.