शासनाकडून बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांडी संच , पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : Bhandi Sanch Yojana 2024

Bhandi Sanch Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत कामगारांना मोफत भांड्यांचा संच उपलब्ध होणार आहे ही योजना बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणार आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाले आहे या योजनेअंतर्गत कोणकोणती भांडी मिळणार आहेत अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रे लागणार आहेत या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि इतर सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Bhandi Sanch Yojana 2024

महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी संच योजना सुरू केली आहे या योजनेमुळे कामगारांना आपल्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असलेल्या भांड्यांचा संच मोफत मिळणार आहे या योजनेअंतर्गत 30 वस्तूंचा संच पण कामगारांना दिला जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Bhandi Sanch Yojana 2024 या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?

Bhandi Sanch Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असून कामगारांना फक्त काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे तर असं करत असताना नोंदणी क्रमांकाची आवश्यकता असते जी बांधकाम कामगारांच्या नोंदणी वेळी दिलेले असते.

अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कामगारांना अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तो पेंडिंग आहे की मंजूर झाला आहे याची माहिती ऑनलाईन तपासता येते.

आवश्यक कागदपत्रे :

  • नोंदणी क्रमांक
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ग्रामपंचायत प्रमाणपत्र
  • वारसा माहिती संमती पत्र

योजनेसाठी पात्रता काय आहे ?

Bhandi Sanch Yojana 2024 योजना फक्त नोंदणी बांधकाम कामगारांसाठी आहे कामगारांनी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीमध्ये असणे आवश्यक आहे तसेच मागील 90 दिवसांमध्ये कामगारांनी किमान 90 दिवसाचे काम केलेले असावे.

कोणत्या 30 वस्तूंचा संच मिळणार ?

  • ताट – 4 नग
  • वाट्या-8 नग
  • पाण्याचे ग्लास-6 नग
  • पातेले झाकणास-1 नग
  • पातेली झाकणास-1 नग
  • मोठा चमचा भात वाटपासाठी-1 नग
  • मोठा चमचा वरण वाटपासाठी-1 नग
  • जग-1 नग
  • मसाला डब्बा-1 नग
  • कढई-1 नग
  • पाणी तापवण्याचे पातेले-1 नग
  • तांब्या-1 नग
  • पाण्याचा भांडे-1 नग
  • साखरेचा डब्बा-1 नग
  • चपाती डब्बा-1 नग
  • फुलपात -1 नग
  • वाटण वाटपासाठी लहान चमचा-1 नग
  • वर्णाचे पातेले-1 नग
  • लहान वाट्या-4 नग
  • पाणी भरण्याचा मोठा चमचा-1 नग
  • पिठाचा डबा-1 नग
  • लोणच्याचा डब्बा-1 नग
  • पाणी तापवण्यासाठी पात्र-1 नग
  • फुलपातलि-1 नग
  • डब्बा झाकणास-1 नग
  • तळण्यासाठी कढई – 1 नग
  • चहाचा सेट – 1 नग

लाडकी बहिणी योजनेचे 3 हजार रुपये 17 ऑगस्टला खात्यात होणार जमा

Official Website : https://mahabocw.in/

Leave a Comment