Vangi Lagavad 2024 खनिजे तसेच अ ब क ई जीवनसत्त्वे वांग्यामध्ये लोह प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे आहे.वांग्याचे उगम स्थान हे भारत असून सर्वच देशांमध्ये व राज्यांमध्ये वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.भारतामध्ये सन 2007 ते आठ या वर्षांमध्ये वांगी पिकाखाली सुमारे 5.6 लाख हेक्टर क्षेत्र तर उत्पादन 95 95 पॉईंट आठ मे टन प्रति हेक्टर होते भारतामध्ये प्रामुख्याने पश्चिम बंगाल ओरिसा बिहार महाराष्ट्र आंध्र प्रदेश व अन्य काही राज्यांमध्ये वांग्याची लागवड केली जाते. महाराष्ट्र मध्ये वांगी पिकाखाली सुमारे 29 हजार 400 हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 479 पॉईंट दोन मे टन व उत्पादकता 16.3 प्रति हेक्टर आहे
Vangi Lagavad 2024 महाराष्ट्रामध्ये विविध भागांत आवडीनुसार वांग्याच्या विविध जाती घेतल्या जातात. सांगली सातारा भागात कृष्णाकाठची चविष्ट वांगी जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहेत. अहमदनगर पुणे व सोलापूर भागांमध्ये काटेरी किंवा डोरले ही वांगे जास्त पसंत केली जातात. तर खानदेशात भारताची वांगे हा प्रकार अधिक लोकप्रिय झालेला असून विदर्भामध्ये कमी काटे असलेले वांगी सर्वांना आवडतात
वांग्यांच्या जातीची निवड करताना मुख्यतः त्या त्या परिसरामधील ग्राहकांची मागणी असणारे तसेच बाजारपेठेमध्ये हमखास चांगला भाव मिळणारा वान निवडणे आवश्यक असते. हवामान भरपूर उत्पादन देणारा रोकडे यांना कमी प्रमाणात बळी पडणारा, व तेथील हवामानाशी मिळत होते घेणारा असणे गरजेचे आहे. वांग्याची लागवड करताना प्रामुख्याने सुधारित व संकरित जातीची निवड रोपवाटिका व्यवस्थापन लागवड पद्धत व खत आणि पाणी व्यवस्थापन पीक संरक्षण या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात
Vangi Lagavad 2024 जाती :
मांजरी गोटा :
या जातीचे फळ मध्यम ते मोठ्या आकाराचे, गोल, जांभळट गुलाबी रंगाचे, त्यावरती पांढरे पट्टे असणारे, असते. या जातींच्या फळांच्या देठावर जास्त प्रमाणात काटे असतात. तसेच ही जात चवीला रुचकर असून फळे चार ते पाच दिवस टिकू शकतात. तसेच या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी 250 ते 300 क्विंटल इतके मिळू शकते.
कृष्णा :
कृष्णा ही जात संकरीत असून ही झाडे काटक असतात. या फळांचा आकार अंडाकृती, रंग आकर्षक जांभळा असून, त्यावरती पांढरे पट्टे असतात. फळांच्या देठावरती व पानांवर ते जास्त प्रमाणात काटे असतात. तसेच या जातीचे सरासरी 400 ते 450 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते
फुले हरित :
फुले हरित जातीची फळे आकाराने मोठे असतात. ही जात भरीत करण्यासाठी चांगली असते. या फळांचा रंग फिकट हिरवा व टोकांकडे पांढरे पट्टे असतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली मानली जाते. या जातीपासून उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी सरासरी 200 ते 480 क्विंटल इतकी असते
फुले अर्जुन :Vangi Lagavad 2024
फुले अर्जुन ही जात संकरित आहे. या जातीची फळे मध्यम आकाराची असतात. या फळांचा रंग हिरवा असतो. या फळांवर ती जांभळे व पांढरे रंगाचे पट्टे असतात. फळांचा आकार गोलाकार व थोडासा लांब प्रकाराचा असतो. मुख्यतः ही जात खरीप व उन्हाळी हंगामासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. या जातीपासून उत्पादन 450 क्विंटल प्रति हेक्टरी मिळू शकते. शिवाय अन्य संस्था व खाजगी कंपन्यांनी या जाती विकसित केलेल्या आहेत.
Vangi Lagavad 2024 हवामान :
वांगी पिकाला कोरडे आणि थंड हवामान चांगल्या प्रकारे मानवते. तसेच ढगाळ हवा आणि एक सारखा पडणारा पाऊस पिकासाठी अनुकूल नसतो. अशा हवामानामध्ये किडी रोगांचा जास्त प्रमाणात उपद्रव होतो. सरासरी 13 ते 21 अंश तापमानामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे येते. श्री कुटुंबात महाराष्ट्रामधील हवामानात जवळपास वर्षभर वांग्याचे पीक घेतले जाऊ शकते.
जमीन :
Vangi Lagavad 2024 वांगी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी चांगला निचरा असलेली आणि मध्यम काळी कसदार जमीन या पिकांसाठी उत्तम समजले जाते. नदीकाठच्या गाळवट जमिनीमध्ये वांग्याचे उत्पादन भरपूर प्रमाणात घेता येते असा शेतकऱ्यांचाअनुभव आहे.
लागवडीचा हंगाम :
Vangi Lagavad 2024 वांग्याची लागवड महाराष्ट्रामधील हवामानात तिन्ही हंगामामध्ये करता येऊ शकते. खरीप हंगामासाठी पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये केली जाते. रब्बी किंवा हिवाळे हंगामामध्ये पेरणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी करतात आणि रोपे ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये लावली जातात. हंगामामध्ये 20 जानेवारी चा दुसरा आठवड्यामध्ये पेरून रोपांची लागवड फेब्रुवारी महिन्यामध्ये केले जाते.
बियाणे प्रमाण :
हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बियाणे कमी वाढणाऱ्या जातीसाठी पुरेसे असते. जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातीसाठी हेक्टरी 120 ते 150 ग्रॅम बियाणे पुरेसे होते. पेरणीच्या आधी बियाण्यांना प्रति किलो तीन ग्रॅम थायरम लावावे.
रोपवाटिका :
वांग्याची रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे साधारणतः तीन बाय दोन मीटर आकाराचे करून ही गादी एक मीटर रुंद व 15 सीएम उंच करावी लागते. वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन पाट्या टाकावे आणि 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत द्यावे. माती व खत मिसळून गादी वाफे मध्ये समप्रमाणात पाणी मिळेल असे पहावे. प्रति वाफ्यामध्ये मर रोगाच्या नियंत्रणाकरिता 30 ते 40 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड वापरावे लागते.
वाफेच्या रुंदी समांतर असे 10 सीएम अंतरावरती त्याच्या सहाय्याने एक ते दोन सेंटीमीटर खोलीच्या ओळी तयार करून यामध्ये पातळ बी पेरावे. सुरुवातीला या वाक्यांना झारीने पाणी द्यावे लागते, यानंतर पाटाने पाणी द्यावे. रोपांच्या जोरदार वाढीसाठी उगवल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाक्याला 50 ग्रॅम युरिया आणि 15 ते 20 ग्रॅम फोरेट दोन ओळींमध्ये काकरी पाहून द्यावे लागते. यानंतर त्यांना हलकेसे पाणी द्यावे. रोगांच्या केव्हा किडींच्या नियंत्रणासाठी दहा दिवसांच्या अंतराने शिफारसी केल्याप्रमाणे कीडनाशकांची फवारणी करावी लागते.Vangi Lagavad 2024
वांग्यांची लागवड करण्यापूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोपे कणखर होतील. लागवड करण्याआधी दिवस रोपांना पाणी द्यावे लागते, रोपे लागवडीसाठी पाच ते सहा आठवड्यांमध्ये रोपे तयार होतात. रोपे 12 ते 15 सीएम उंचीची झाल्यानंतर लागवडी करणे योग्य बनतात.
रोपांची लागवड :
रोपांची लागवड करण्यापूर्वी मध्ये नांगरट करून चांगली मशागत करावी लागते व शेणखत सुद्धा मिसळावे लागते. हलक्या जमिनीमध्ये 75 बाय 75 सीएम होळीचे अंतर तर जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातींसाठी 90 बाय 90 सेंटीमीटर अंतर ठेवावे लागते. मध्यम किंवा काळा कसदार जमिनीमध्ये कमी वाढणाऱ्या जातींसाठी 90 व 75 सीएम व जास्त वाढणाऱ्या जातींसाठी 100/90 सीएम अंतर ठेवणे आवश्यक आहे
खत व्यवस्थापन :
खत मात्रांचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. मध्यम काळा जमिनीसाठी हेक्टरी 150 किलो नत्र, 10 किलो स्फुरद, आणि 50 किलो पालाश द्यावे लागते. उरलेले अर्धे नत्र लागवड केल्यानंतर तीन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावे लागते.Vangi Lagavad 2024
पहिला हप्ता लागवडीनंतर एका महिन्याने, दुसऱ्या हप्ता नंतर एका महिन्याने आणि तिसऱ्या शेवटच्या हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यानंतर द्यावा लागतो. खतांची मात्रा दिल्यानंतर लगेचच पाणी द्यावे लागतात.
वांगी लागवड बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Green Gold Agri
FAQ
रोपांची लागवड कशी करावी ?
रोपांची लागवड करण्यापूर्वी मध्ये नांगरट करून चांगली मशागत करावी लागते व शेणखत सुद्धा मिसळावे लागते.
वांगी लागवडीसाठी हवामान कसे असावे ?
वांगी पिकाला कोरडे आणि थंड हवामान चांगल्या प्रकारे मानवते.
वांगी पिकांना खताची मात्रा कशी द्यावी?
मध्यम काळा जमिनीसाठी हेक्टरी 150 किलो नत्र, 10 किलो स्फुरद, आणि 50 किलो पालाश द्यावे लागते. उरलेले अर्धे नत्र लागवड केल्यानंतर तीन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावे लागते.