Mantrimandal Baithak 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली आहे या बैठकीमध्ये विविध विभागाचे तब्बल 19 निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे सोबतच ज्येष्ठांसाठी महामंडळ बनवण्यात येणार असून त्यामधून सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ होईल असे सांगण्यात आले आहे.
Mantrimandal Baithak 2024 राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले 19 निर्णय :
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आले आहे मार्च 2024 पासून अंमलबजावणी लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.
- राज्यांमधील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे
- प्रवर्तकांच्या मानधना मध्ये 4 हजारांची भरीव वाढ करण्यात येणार आहे
- ऑलिम्पिकवर स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे
- थकीत वीज बिल देण्यासाठी महावितरण कंपनीस कर्जासाठी शासन हमी सुद्धा मिळवून देण्यात येणार आहे
- पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार पुणे परिसरामध्ये सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे Mantrimandal Baithak 2024
- नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प 7015 कोटीस मान्यता देण्यात आली असून नाशिक जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे.
- सहकारी साखर कारखान्यांना शासन हमी वरती कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर ते जबाबदारी देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे
- शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्ट पर्यंत
- ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी जेष्ठांना मिळणार लाभ
- ठाणे येथील महत्वकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रति 5000 कोटी उभारणार असल्याची माहिती मिळत आहे
- 763 विद्यार्थ्यांना अधिछात्र वृत्तीचा संपूर्ण लाभ दिला जाणार
- मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार विधिमंडळ हे प्रकल्प राबवणार असल्याची ही माहिती समोर येत आहे
- कोल्हापूर वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ
- कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णासाठी भाडेपट्टा सेवाशुल्क माफ करण्यात येणार आहे
- चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणामध्ये फेरबदल
- श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरांच्या जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना मिळणार
- पाचोरा येथील सहकारी सूतगिरणी शासन अर्थसहाय्य देणार
- सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन Mantrimandal Baithak 2024
आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार