Aasha Sevika Anudan Yojana 2024 शासनाने महिला अशा सेविकांना आणि गटप्रवर्तकांना दहा लाख रुपये आणि पाच लाख रुपये असे अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे हे अनुदान अपघाती मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दिले जाणार आहे या संदर्भातील शासनाने निर्णय निर्गमित केलेला आहे या निर्णयामुळे हजारो अशा सेविका आणि गड प्रवर्तकांना फायदा होणार आहे या अनुदानाचे स्वरूप आणि यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये पाहणार आहोत.
Aasha Sevika Anudan Yojana 2024 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग निर्णय :
- सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेतला आहे
- महाराष्ट्र शासनाने अशा सेविकांसाठी दहा लाख रुपये आणि पाच लाख रुपये अनुदानाची मान्यता दिलेली आहे
- अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासन द्वारे घेण्यात आला आहे
- हा निर्णय एक एप्रिल 2020 पासून लागू करण्यात येणार आहे
- अशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या कार्याचा आणि त्यांना येणाऱ्या संकटांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे
- सरकारने या निर्णयासाठी दीड कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे
- या निधीची उपलब्धता आगामी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी द्वारे केली जाणार आहे.
निधी मंजुरी आणि पुरवठा योजना :
Aasha Sevika Anudan Yojana 2024 शासन द्वारे या निर्णयासाठी प्रतिवर्षी दीड कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि तिची उपलब्ध करण्यासाठी शासनाने पुरवणी मागणी द्वारे अधिवेशनामध्ये हा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे तसेच या निधीचा योग्य वापर आणि व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित यंत्रणा तयार करण्यात आली आहे शासन निर्णयांमध्ये उल्लेख केलेल्या अटीनुसार या निधीचा वापर अशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या सहाय्य आणि अनुदानासाठी केला जाणार आहे.
या निर्णयाचा सेविकांवरील परिणाम :
हा निर्णय लागू झाल्यानंतर हजारो अशा सेविका आणि गटप्रवर्तकांना याचा फायदा मिळणार आहे या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण आणि भविष्याचे नियोजन करता येणार आहे शासनाने दिलेल्या या मान्यतेमुळे महिला अशा सेविका आणि गटप्रवर्तकांचा आत्मविश्वास वाढणार आहे त्यांच्या कार्यासाठी मिळालेल्या या अनुदानामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची देखील आर्थिक सुरक्षा वाढणार आहे. Aasha Sevika Anudan Yojana 2024