लाडकी बहीण योजनेच्या अर्जामध्ये मोठा बदल ; असा भरा ऑनलाइन फॉर्म, नवीन पद्धत : Ladki Bahin Yojana Navin Form 2024

Ladki Bahin Yojana Navin Form 2024 राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याची अंतिम मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेले आहे या संदर्भातील सरकारने नवीन शासन आदेश जाहीर केला आहे आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तर काही अर्ज रद्द झाल्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही.

Ladki Bahin Yojana Navin Form 2024

ज्या महिलांनी अर्ज अजूनही भरला नाही त्यांना आता नवीन अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे योग्यरित्या अर्ज भरल्यास योजनेच्या माध्यमातून निधी या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकणार आहेत.

Ladki Bahin Yojana Navin Form 2024 नवीन अर्ज कसा भरावा ?

  • अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे
  • लॉगिन करण्यासाठी नवीन असल्यास खाते तयार करा या पर्यायावर क्लिक करावे यानंतर आधार कार्ड वर आधारित तुमचे नाव इंग्रजीमध्ये भरा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकावा
  • यानंतर या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की जिल्हा तालुका गाव महानगरपालिका किंवा नगरपालिका इत्यादी निवडावे
  • ऑथराईज्ड पर्सन मध्ये तुमच्या व्यवसायानुसार योग्य पर्याय निवडावा
  • टम्स अँड कंडिशन्स वाचून स्वीकार आणि कॅप्चा कोड भरा यानंतर साइन अप करा
  • आधार क्रमांक टाकावा आणि कॅपच्या कोड भरून त्याची पडताळणी करावी
  • अर्जदाराचे नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, वैवाहिक स्थिती, जन्मतारीख, पत्ता, मतदार संघ आणि अधिकृत मोबाईल नंबर इत्यादी भरावा
  • आधार लिंक असलेल्या बँक खात्याचा क्रमांक आणि आयएफएससी कोड टाकावा
  • आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, बँक पासबुक आणि स्वतःचा फोटो अपलोड करावा
  • अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करावे किंवा ते डाऊनलोड करून भरून अपलोड करावे
  • सर्व माहिती तपासून वरचे सबमिट करावे ड्राफ्ट मध्ये सेव करा या पर्याय वरती क्लिक करू नये Ladki Bahin Yojana Navin Form 2024

लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

नव्या विहिरींना चार लाख, तर जुन्या दुरुस्ती 1 लाख अनुदान मिळणार

Leave a Comment