90 दिवसासाठी सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करण्यास मान्यता : Soyabean kharedi 2024

Soyabean kharedi 2024 कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठ पुराव्याला यश मिळाले असून केंद्र सरकार द्वारे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमीभावाने खरेदी सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे.

Soyabean kharedi 2024

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळी मध्ये आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती तसेच दिल्ली येथे भेटूनही याबद्दल पाठपुरावा केला होता.केंद्र सरकारने महाराष्ट्राने कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमती 4892 रुपये प्रतिक्विंटल इतके निश्चित केले असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह वेळोवेळी पाठपुरावा आणि समर्थन देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Soyabean kharedi 2024 राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि त्यांचे बाजारभाव पडल्यामुळे नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आले आहे याबरोबरच सोया मिल्क, खाद्यतेल, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यासाठी शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्मितीसाठी प्रतीक्विंटल किमान 50 डॉलर अनुदान द्यावे.

मी याबद्दल केंद्र सरकारकडे सातत्याने पत्र व्यवहार आणि पाठपुरावा तसेच या संदर्भातील केंद्रीय कृषिमंत्री सिंह राशी चौहान यांच्याशी देखील वारंवार संपर्क मध्ये होतो केंद्र सरकारने 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू करण्यासाठी मान्यता दिल्याने सो आधुनिक परीक्षित करांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असल्याचा मला मनापासून आनंद होत आहे अशा भावना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहेत.

Soyabean kharedi 2024 यावर्षी सोयाबीन पिकाला जास्तीचा भाव :

  • मागील वर्षी सोयाबीनच्या दरामध्ये खूप मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला होता
  • त्यामुळे यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वित्तमंत्री अजित पवार यांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना प्रती हेक्टरी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती
  • यानुसार सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होणार आहे यावर्षी सोयाबीनचे पीक सध्या जोमात असले तरी सप्टेंबर अखेरीस पाऊस असल्यामुळे फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. Soyabean kharedi 2024

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत ?

Leave a Comment