Nuksan Bharpai 2024 : राज्य सरकारने अवकाळी आणि अतिवृष्टीने नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केलेले आहेत. यामध्ये एकूण 18 जिल्ह्यातील अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत निधी देण्यात येणार आहे.
अतिवृष्टी मदत निधी कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहे ?
यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, पुणे, सातारा,, सोलापूर, सांगली, गोंदिया, लातूर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये या समावेश असणार आहे. जून ते ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एक जानेवारी 2024 शासन निर्णयानुसार जिरायत भागात आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या नवीन दराने जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित मदत देण्यात यावी असा उल्लेख शासन निर्णयात केलेला आहे .तीन एकर ऐवजी दोन हेक्टर ची मदत ते ही जुन्यात दरानुसार मिळाल्याने बहुतांश शेतकरी यापूर्वी तक्रार केली होती. त्यामुळे नागपूर विभागासाठी आठ कोटी पुणे विभागासाठी दोन कोटी अशा अनेक जिल्ह्यांमध्ये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
नुकसान भरपाईसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे ?
Nuksan Bharpai 2024 विविध विभागांमध्ये जून ते ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यामध्ये 23 कोटी 72 लाख 93 हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेले आहे .त्याचे वाटप गोंदिया पुणे लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रत्नागिरी रायगड अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच पुणे विभागासाठी दोन कोटी छत्रपती संभाजी नगर विभागासाठी तीन कोटी आणि नाशिक विभागासाठी सात कोटी असेच वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळे निधी मंजूर करण्यात आलेले आहेत.
कोणाला मिळणार अवकाळी व अतिवृष्टी मदत निधी ?
- फेब्रुवारी 2024 मध्ये बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी मुळे शेतकरी चिंताग्रस्त होते शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं.
- या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पाच कोटी पाच लाख सात हजार तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 17 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.Nuksan Bharpai 2024
- अवकाळी आणि अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांना देण्यात न आलेला अवकाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरलं होतं त्यावेळी राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्त जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे पूर्ण होतील .
- आणि विभागीय आयुक्तांकडून अधिकच्या निधीचे प्रस्ताव प्राप्त होतील आणि मदत निधीचे वाटप करण्यात येईल असं सांगितलेलं होतं त्यानुसार आता अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.