महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पैसे झाले मंजूर : Mahatma Phule Karj Mukti Yojana 2024

Mahatma Phule Karj Mukti Yojana 2024 : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अमलात आणलेली होती. तसेच आता काही शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण केलेला केलेल्या अकरा हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांना प्रत्येकी 50000 रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

Mahatma Phule Karj Mukti Yojana 2024

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळेल ?

Mahatma Phule Karj Mukti Yojana 2024 महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रमाणीकरण केलेल्या 11836 शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहे .ही एकूण रक्कम 46 कोटी 70 लाख रुपये असून सर्वाधिक 829 शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. राज्य सरकारने 2019 मध्ये नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आहे.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून सर्व शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये पर्यंतचा लाभ….

अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची प्रोत्साहन पर अनुदान देण्याची जाहीर करण्यात आले. यासाठी आधार संलग्न बँक खाते बंधनकारक करण्यात आले होते .मात्र ऑगस्ट अखेर ते 33 हजार 356 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणे करून केलेले नसल्यामुळे आढळल्यानंतर त्यांना प्रोत्साहन पर लाभ देता येत नव्हता त्यासाठी राज्य सरकारने 12 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर अशी मुदत दिलेली होती.

सर्वाधिक लाभ कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे ?

Mahatma Phule Karj Mukti Yojana 2024 हे मुदत संपल्यानंतर या योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेमध्ये ११८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 46 कोटी 70 लाख रक्कम राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 829 शेतकऱ्यांना तीन कोटी 52 लाख जळगाव जिल्ह्यातील 729 शेतकऱ्यांना तीन कोटी सात लाख तर नाशिक जिल्ह्यातील 713 शेतकऱ्यांना तीन कोटी 54 लाख रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे.

आंबिया बहारमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाईची रक्कम !! पहा संपूर्ण माहिती

Leave a Comment