Annapurna Yojana Labharthi 2024 राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते.परंतु त्याची अंमलबजावणी कशी असणार याबद्दल स्पष्टता नव्हती अखेर 4 ऑक्टोंबर 2024 रोजी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून लाडके बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या महिलेच्या नावावर ती गॅस जोडणी करावी लागणार आहे त्यानंतर अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
राज्यांमधील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेऊन 30 जुलै रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे.प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी कुटुंबामधील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेमधील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत होती याबद्दल स्पष्टता नसल्यामुळे अनेकांना लाभ घेता येत नव्हता.
Annapurna Yojana Labharthi 2024 याबद्दल शासनाच्या पुरवठा विभागाने सूचना जारी केल्या असून यामध्ये म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला आणि बालविकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांवर 1 जुलै 2024 पर्यंत शिधा पत्रिकेनुसार कुटुंबामध्ये इतर सदस्यांच्या नावे गॅस तोडणी असल्यामुळे महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे क्लास सोडणे हस्तांतरण केल्यानंतर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील.
Annapurna Yojana Labharthi 2024 जिल्ह्यातील 6 लाख महिलांना मिळणार लाभ :
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 ऑक्टोंबर पर्यंत सहा लाख 39 हजार 478 अर्ज मंजूर झालेले आहेत या महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन झाल्यानंतर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल.
अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- अर्जदार ईडब्ल्यूएस, एसससी, एसटी सदस्य असावा
- अर्जदार फक्त पाच सदस्यांचे कुटुंब असावे
Annapurna Yojana Labharthi 2024 असा करा अर्ज :
- योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी त्यानंतर या योजनेचा मुख्य डॅशबोर्ड ओपन होईल
- स्कीम या पर्यावरण क्लिक करायचे आहे आणि ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला दुसरा पृष्ठावर ती पुनर्निर्देशित केले जाईल तेथे सर्व तपशील भरावा लागेल
- सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करावी आणि त्यानंतर सबमिट यावर क्लिक करावे
- अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करू शकता
अन्नपूर्णा योजनेचा अधिकृत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407301150453906.pdf