पिक विमा नुकसान भरपाई साठी १९२७ कोटी मंजूर ; कृषी विभागाने दिली माहिती : Pik Vima Nuksan Bharpai Nidhi 2024

Pik Vima Nuksan Bharpai Nidhi 2024 खरीप 2023 हंगाम राज्यामध्ये एकूण 7621 कोटी रुपयांची पिक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे पिक विमा योजनेमध्ये राज्यात बीड पॅटर्न वर आधारित राबविण्यात येते म्हणजेच ज्या ठिकाणी पिक विमा हप्त्याच्या 110 टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई आली आहे त्या ठिकाणी 110 टक्क्यापर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते आणि त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते या तत्त्वानुसार खरीप हंगाम 2023 साठी मंजूर 721 कोटी पैकी विमा कंपनीमार्फत रुपये 546 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली होती.

Pik Vima Nuksan Bharpai Nidhi 2024

तर उर्वरित नुकसान भरपाई पैकी 1927 कोटी रुपयांची नुकसान भरपाई प्रलंबित होती सर्वात जास्त पीक विमा नुकसान भरपाई एकट्या नगर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून घेणे होते या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाकडून दिनांक 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता या दरम्यान 30 सप्टेंबरच्या रात्री 11:30 वाजता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्र मधील अहमदनगर शहर सहा जिल्ह्यांचा प्रलंबित असलेल्या सुमारे 1927.52 कोटी रुपयांची रक्कम देण्याचा जीआर प्रसिद्ध केला त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे 10 ऑक्टोंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

Pik Vima Nuksan Bharpai Nidhi 2024 दिनांक 10 ऑक्टोंबर पासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून अहमदनगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीक विमा नुकसान भरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे तर उर्वरित नाशिक सोलापूर सातारा चंद्रपूर जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच वाटप सुरू करण्यात येणार आहे.

Pik Vima Nuksan Bharpai Nidhi 2024 या दिवशी पिक विमा होणार खात्यावर जमा :

Pik Vima Nuksan Bharpai Nidhi 2024 प्रलंबित नुकसान भरपाई मध्ये नाशिक 656 कोटी रुपये, जळगाव 470 कोटी, अहमदनगर 713 कोटी रुपये, सोलापूर 2.66 कोटी, सातारा 27.7 कोटी रुपये आणि चंद्रपूर 58.5 कोटी रुपये प्रलंबित होते ही प्रलंबित रक्कम रुपये 1927 कोटी मंजूर केले असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लगेच जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे 10 ऑक्टोंबर नंतर शेतकऱ्यांचे बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती अहमदनगर कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

सरकारकडून 15 दिवसात हजारो कोटींचा निधी मंजूर

Leave a Comment