Rain Alert 2024 ऑक्टोबर हीटचा उकाडा सोसल्या नंतर राज्यामध्ये परतीच्या पावसाच्या सरी पडत आहेत आज कोकण मध्ये महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ऊन वाढल्यामुळे कमाल तापमान 36 अंश पार केले होते परंतु दोन दिवसापासून होणाऱ्या पावसाळी वातावरणामुळे तापमानामध्ये घट झाली असून पारा पुन्हा 35 अंशाच्या खाली घसरला आहे गुरुवारी दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांक 35.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे उर्वरित राज्यात तापमानात घट झाली आहे.
Rain Alert 2024 कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्यामुळे आज कोकण मधील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्र मधील पुणे सातारा कोल्हापूरची या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा आहे उर्वरित राज्यात ऊन कमी अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Rain Alert 2024 मान्सून थांबला :
Rain Alert 2024 नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी 23 सप्टेंबर रोजी वायव्य भारतामधून परतीचा पाऊस सुरू केल्यानंतर वाटचाल अडखळत सुरू होती शनिवारी महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागांमधून मान्सूनने माघार घेतली आहे त्यानंतर मात्र पाच दिवसापासून मान्सूनची वाटचाल पुन्हा थांबली महाराष्ट्राच्या हलकी काही भागातून मान्सून परतण्यास पोषक हवामान होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी :
Rain Alert 2024 रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर पालघर ठाणे मुंबई धुळे जळगाव नाशिक नगर सांगली सोलापूर छत्रपती संभाजी नगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.