नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता ; मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी निर्णय : Cabinet Decision 2024

Cabinet Decision 2024 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णयांचा पाऊस पडला जात आहे सरकारने गुरुवारी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 80 निर्णय घेतल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Cabinet Decision 2024

यामध्ये शेतकऱ्यांसाठी चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे तर राज्य सरकारने अग्रेसर योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे तसेच बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी अतिरिक्त निधी आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

Cabinet Decision 2024 केंद्राची ॲग्री स्टॅक योजना राज्यात राबवणार :

Cabinet Decision 2024 राज्यातील कृषी क्षेत्रांमधील डिजिटल सेवांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र सरकारचे अग्रेसर मिशन राबवले जाणार आहे यामध्ये माहिती निर्मिती कक्ष शेतकरी माहिती संच हंगामी पिकांचा माहिती संचय आणि भू संदर्भातील भूभाग असणारे गाव नकाशा माहिती संच महसूल विभाग तयार करणार आहे.

त्यासाठी माहिती वापर कक्षाची स्थापना करण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे आहे सुकाणू समिती अंमलबजावणी समिती क्षेत्रातील स्तरावर विभाग स्तरीय जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात येतील पिकांच्या माहिती संचासाठी तिन्ही हंगामात मिळून सुमारे 81 कोटी 83 लाख रुपये खर्च दरवर्षी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार :

Cabinet Decision 2024 जागतिक बँक अर्थ सहाय्यक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे या प्रकल्पामध्ये एकूण 21 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर बीड जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली तर विदर्भातील अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव आणि नाशिक अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये अंदाजे 6 हजार कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.

Cabinet Decision 2024 बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी अतिरिक्त निधी :

मराठवाड्यातील हिंगोली नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते त्यामुळे हळदी वरील संशोधन प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे यासाठी 709 कोटी 27 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना :

Cabinet Decision 2024 पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करून या विभागाचे नामकरण पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे पुनर्रचनेनंतर पशुसंवर्धन आयुक्तालय व दुग्ध व्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय असे या पदाचे नाव राहील.

अतिवृष्टीसाठी या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मंजूर

Leave a Comment