पिक विमा भरपाईचे नियम बदलणार ? योजनेतील नियम बदलण्याची शेतकऱ्यांची मागणी : Pik Vima Bharpai 2024

Pik Vima Bharpai 2024 पिक विमा योजनेचे काही नियम शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी 72 तासात पूर्व सूचना देणे बंधनकारक असणार आहे परंतु विमा कंपन्यांनी वेळेत पंचनामे केले नाही किंवा वेळेत भरपाई दिली नाही तर विमा कंपन्यांवर कारवाई केली जात नाही तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये भरपाई देण्याचा निर्णयात बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे या योजनेमध्ये राज्यांना कमी अधिकार असल्यामुळे कंपन्या तू मानत नाहीत असे अनेक नियम अडचणीचे असून ते बदलण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

Pik Vima Bharpai 2024

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे मागील काही दिवसापासून शेतकरी, शेतकरी संघटना नेते शेती क्षेत्रामधील जाणकार तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करत आहेत शेतामधील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे हे जाणून घेत आहे त्यापैकी मध्ये आणि चर्चामध्ये पीक विमा योजनेमध्ये सुधारणा करण्याची मागणी शेतकरी नेते आणि अभ्यासकांनी केले आहेत पिक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची मागणी पुढे आल्यानंतर कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आवश्यक ते बदल करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे त्यामुळे पुढील काळात पीक विमा योजनेमध्ये काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pik Vima Bharpai 2024 पिक विमा योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची मागणी पुढे आली ती राज्यांना जास्त अधिकार देण्याची सध्या पिक विमा योजनेमध्ये जास्त अधिकार केंद्राला आहेत राज्य सरकारला खूपच कमी अधिकार देण्यात आले आहेत त्यामुळे विमा भरपाई वरून एखादा तिढा निर्माण झाला किंवा विमा कंपन्यांनी भरपाई ला नकार दिला तर अंतिम उपाय केंद्र पातळीवरती निघतो.

Pik Vima Bharpai 2024 :

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकरी नेत्याच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन दिले आहे पिक विमा नुकसानीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी विमा योजना सुरू केली आहे त्यामध्ये राज्य सरकारांनी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात हा खर्च शेतकऱ्यांसाठी आहे परंतु जर शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसेल तर बदल करण्यात येतील असेही आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. Pik Vima Bharpai 2024

सोयाबीन काढून ज्वारीची पेरणी ; आता खरिपातील सोयाबीन पीक पाहणी कशी करायची ?

Leave a Comment