Sinchan Karj Mafi 2024 राज्यातील नोंदणी रद्द झालेल्या तसेच कार्यरत सिंचन संस्थांची 132 कोटी 54 लाख रुपयांची कर्जमाफी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे यामध्ये अवसायानात आणि नोंदणी रद्द झालेल्या शेती सिंचन योजनेचे 83 कोटी 9 लाख तर कार्यरत असलेल्या संस्थांचे निम्मे म्हणजे 49 कोटी 45 लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे या निर्णयाचा राज्यांमधील 42 हजार 842 हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सध्या राज्यात 2659 उपसा सिंचन सहकारी संस्था असून 261 संस्थांकडे बँकांची थकबाकी आहे या संस्थांपैकी 144 संस्था सध्या सुरू असून 47 संस्था अवसायनात आणि 70 संस्थांची नोंदणी रद्द झाली आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पावसाळ्यातील आणि नोंदणी रद्द झालेल्या 117 संस्थांचे मुद्दल कर्ज 83 कोटी 9 लाख माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Sinchan Karj Mafi 2024 132 कोटींची कर्जमाफी :
Sinchan Karj Mafi 2024 याचप्रमाणे सध्याच्या कार्यरत 144 संस्थांचे 50% मुद्दल कर्ज अशी 49 कोटी 45 लाख रुपये माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशा प्रकारे एकूण 132 कोटी 54 लाख मुद्दल कर्जमाफी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.राज्यांमधील शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली आणण्यासाठी सहकारी तत्त्वावर उपसा सिंचन संस्थांची स्थापना केली आहे या सिंचन योजनांना विविध वित्तीय संस्था आणि बँकांनी कर्ज पुरवठा केला होता यासाठी शेतकऱ्यांची जमीन तारण ठेवण्यात आली होती.
या संस्था कर्जत बुडाल्यामुळे अवसायनात गेल्या तर काही बंद झाल्या तसेच सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक संस्था अडचणीत आल्या आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते काही शेतकऱ्यांच्या दुसऱ्या पिढीला याचा फटका बसत होता शेतीवरती कर्जाचा बोजा वाढत असल्यामुळे नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचणी येत होत्या त्यामुळे या संस्थांची कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात आली होती. Sinchan Karj Mafi 2024