बियाणे टोकन यंत्र खरेदीसाठी अर्ज सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार शासनाकडून 50% अनुदान : Biyane Tokan Yantra Anudan Yojana 2024

Biyane Tokan Yantra Anudan Yojana 2024 महाडीबीटी वेबसाईट वरती बियाणे ठोकून यंत्रासाठी 50% अनुदानावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहेत ज्या शेतकऱ्यांना ही अर्ज सबमिट करायचे आहेत त्यांनी त्यांचे अर्ज शेवटच्या तारखेच्या आत सादर करून घ्यावे.

 Biyane Tokan Yantra Anudan Yojana 2024

जर तुम्हाला बियाणे टोकण यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा हे माहीत नसेल तर आज आपण आपल्या या लेखामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हे पाहून तुम्ही बियाणे टोकण यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सबमिट करू शकता.

Biyane Tokan Yantra Anudan Yojana 2024 सविस्तर माहिती :

Biyane Tokan Yantra Anudan Yojana 2024 खरीप असो की रब्बी पेरणी करत असताना मजूर जमा करताना शेतकरी बांधवांची खूप धावपळ होते अशावेळी तुमच्याकडे जर बियाणे टोकण यंत्र असेल तर अगदी सहज पद्धतीने आणि कमी वेळात जास्त काम केले जाऊ शकते हे बियाणे टोकण यंत्र बाजारामधून खरेदी करायचे असेल तर त्यासाठी खर्च खूप जास्त येतो पण आता शासन यासाठी 50% अनुदान देत असून यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी या वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे.

पेरणीसाठी टोकन यंत्र वापरणे म्हणजेच मजुरांच्या समस्येवरती उत्तम असा उपाय आहे बऱ्याच शेतकऱ्यांना महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज कसा करावा यासंदर्भातील माहिती नसते .त्यामुळे अनेक शेतकरी अशा महत्त्वाच्या योजनांच्या लाभांपासून वंचित राहतात.

Biyane Tokan Yantra Anudan Yojana 2024 अर्ज कुठे करावा ?

  • बियाणे टोकण यंत्र अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लायसन्स किंवा आयडी ची गरज नसते तुम्ही जर शेतकरी असाल तर स्वतः या योजनेसाठी अर्ज करू शकता अट मात्र एकच आहे की तुमच्या आधारशी तुमचा मोबाईल नंबर लिंक केला असावा.
  • महाडीबीटी या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही स्वतः या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता
  • आधार ओटीपी च्या सहाय्याने लॉगिन करून तुम्ही अर्ज सादर करू शकता एकदा का लॉगिन झाले की मग टोकण यंत्राचा इतर विविध योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता
  • जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर 23.60 एवढे शुल्क शासनाला भरावे लागते त्यानंतर तुम्हाला पावती येते ही पावती पुढील संदर्भासाठी जपून ठेवावी.

सिंचन योजनांची 132 कोटींची कर्जमाफीसाठी मान्यता

बियाणे टोकन यंत्राचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

Leave a Comment