Ativrushti Nuksan Bharpai 2024 जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरच महिन्याची शक्यता वर्तवली जात आहे विभागीय आयुक्तांनी भरपाईच्या निधी मागणीसाठी पाठवलेल्या प्रस्तावाला मुख्य सचिवांनी मंजुरी दिली असून विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मंजूर भरपाईचे वाटप करण्याची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितले आहे.
ही परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना भरपाई चे वाटप लगेच सुरू होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केल्यानंतर एक लाख 80 हजार 786 शेतकऱ्यांचे 1 लाख 63 हजार 977 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Ativrushti Nuksan Bharpai 2024 :
शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार हेक्टरी 13800 यांप्रमाणे भरपाईसाठी 221 कोटी 81 लाख 30 हजार 80 रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी 4 ऑक्टोबरला विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता.आयुक्तांनी लगेच असतो प्रस्ताव सरकारला सादर केल्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली यामुळे या प्रस्तावाला मुख्य सचिवांनी मंजुरी दिली असून निवडणूक आयोगाकडून भरपाईचे वाटप करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
Ativrushti Nuksan Bharpai 2024 : मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून लवकरच परवानगी मिळण्याची आशा वर्तवली जात आहे दरम्यान 75 पैकी 36 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून अतिवृष्टी न झालेल्या तालुक्यात पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या पिकांचे पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयुक्तांकडे परवानगी महिन्या बद्दल प्रस्ताव पाठवला आहे दरम्यान ऑक्टोंबर मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या कृपेने बद्दल अजून काहीच हालचाल नसल्याचे दिसत आहे.