राज्यात 3 दिवस वादळी पाऊस पडण्याची शक्यता !! हवामान विभागाने दिली माहिती : Havaman Andaj 2024

Havaman Andaj 2024 महाराष्ट्रात रवरी म्हणजे 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत वादळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अनेक शेतकरी सध्या त्यांच्या शेतामधील कापूस सोयाबीन किंवा इतर पिके गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत अशा वेळी हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आलेल्या या इशारा मुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Havaman Andaj 2024

सध्या अनेक शेतकरी शेतामध्ये कापूस वेचणी करत आहेत काही शेतकरी शेतामध्ये सोयाबीनची मळणी देखील करत आहे सोयाबीनला आधीच बाजारात भाव न मिळाल्यामुळे शेतकरी नाराज आहे त्यामध्ये जर पावसाने सोयाबीन भिजले तर अजून कमी भाव मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतामधील सोयाबीन झाकून ठेवावे जेणेकरून त्यामध्ये पाणी जाऊन पिकांचे नुकसान होणार नाही.

Havaman Andaj 2024 कधी पडणार पाऊस ?

महाराष्ट्र राज्यामधील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना सह हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी पर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे याचा परिणाम असा होतो की या भागाकडून बाष्पयुक्त वारे वाहते.

Havaman Andaj 2024 या सर्वांचा परिणाम कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे एक नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान हा वादळी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Havaman Andaj 2024 वादळी पावसाची शक्यता पिके सुरक्षित ठेवावीत :

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्यामुळे आधी शेतकरी नाराज आहेत अशा मध्ये जर पावसामुळे सोयाबीन भिजले तर अजूनच भाव कमी होऊ शकतो त्यामुळे सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल किंवा कोणतीही पिके असतील तर ही पिके शेतकऱ्यांनी सुरक्षित ठेवायचे आहेत.

Havaman Andaj 2024 या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील कपाशीचे देखील नुकसान होऊ शकते कापूस मोठ्या प्रमाणात वेचणीसाठी आला असून अशा वेळी जर पावसामध्ये हा कापूस भिजला तर काळा देखील पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कापूस असेल तर वेचणी करून घ्या सोयाबीन जमा केली असेल तर व्यवस्थित झाकून ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या शेतामधील पिकांचे या वादळी वाऱ्यामुळे नुकसान होणार नाही.

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार ?

हवामान अंदाज विषयक अधिक माहितीसाठी हवामान अंदाज विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://www.imdpune.gov.in/

Leave a Comment