Soyabean Kharedi 2024 शेतकऱ्यांची आर्थिक लूट होता कामा नये म्हणून नाफेडच्या वतीने सोयाबीन खरेदीसाठी लातूर जिल्ह्यामध्ये 15 हमीभाव केंद्राचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकरी ऑनलाईन अर्ज करत असून आतापर्यंत 1334 शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्राचा आधार घेणे आवश्यक ठरत आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी खरीप हंगामाचा 5 लाख 98 हजार 832 हेक्टर वरती पेरा झाला होता यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचा पेरा 4 लाख 90 हजार 906 हेक्टरवर झाला आहे मध्यंतरी जेमतेम पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पीक चांगले आले होते मात्र काढणीच्या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला परिणामी बहुतांश शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे.
राशी नंतर शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणू लागल्यानंतर बाजारपेठेमध्ये 4370 प्रतिक्विंटल भाव मिळू लागला होता हमीभावाच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले त्यामुळे शासनाने महिन्याभरापासून हमीभाव केंद्रावर ती सोयाबीन विक्रीसाठी नोंदणीचे आवाहन केले आहे यासाठी प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1334 शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे आद्रता अधिक असल्यामुळे शेतमाल खरेदी करणे केंद्रांना अडचणीचे ठरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल वाळवून आणावा.
9 लाख रुपयांची खरेदी :
हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यामध्ये 15 केंद्र सुरू करण्यात आले आहेत आतापर्यंत 13 शेतकऱ्यांनी 180 क्विंटल सोयाबीन विक्री केली आहे ती आठ लाख 78 हजार 114 रुपयांची आहे 12 टक्क्यांपेक्षा कमी आद्रता असलेल्या सोयाबीनची विना विलंब खरेदी सुरू करण्यात आली आहे.
Soyabean Kharedi 2024 नोंदणीसाठी फक्त 15 दिवस शिल्लक :
Soyabean Kharedi 2024 सोयाबीन विक्रीच्या नोंदणी प्रक्रियेसाठी 1 ऑक्टोंबर पासून सुरुवात करण्यात आली होती 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी जवळच्या केंद्रावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे यासाठी आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, ऑनलाईन पीक पेरा, असलेला सातबारा उतारा आणि आवश्यक असल्याचे जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
शिधापत्रिकाधारकांना उद्यापासून लागू होणार नवीन नियम
सोयाबीन खरेदी साठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या आणि तिथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोयाबीन खरेदी केंद्र ला तुमच्या सोयाबीन विक्रीसाठी अर्ज करू शकता :