Dr.Babasaheb Ambedkar बाबासाहेबांनी भारतीय समाजाला दिलेल्या जातीय अंताच्या कार्यक्रमाचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव फक्त भारतापुरतं मर्यादित नाही. अमेरिकेत चालणारा आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल किंवा जर्मनीत आंबेडकरांच्या नावाने चालवली जाणारी चळवळ. किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडनमध्ये ते राहत असलेल्या जागांमध्ये त्यांची तयार झालेली स्मारके एवढीच त्यांची कार्याची व्याप्ती नाही. जगभरातील समाजांमध्ये असणारे शोषित वंचित घटक व बहुसंख्यांक लोकांकडून पिडले जाणारे. अल्पसंख्यांक या सगळ्यांनाच आपल्या अन्यायावरती वाचा फोडण्यासाठी आंबेडकरांनी लिहिलेलं मुक्तीचं तत्वज्ञान आपलंस वाटतं. रोमानी किंवा रोमा या नावाने ओळखले जाणारे हे लोक म्हणजे युरोपातील गरीब भाबडी दलित जनताच म्हणता येईल.
खरं म्हणजे हे लोक भारतातील राजस्थान हरियाणा पंजाब नैऋत्येकडील काही भागांमधून प्रवास करत युरोपात आलेले. आणि त्यांना रोमा हे नाव कदाचित संस्कृत मधील किंवा इतर भारतीय भाषांमधील डोम या एका दलित जातीच्या नावावरून पडलं असावं. असा तज्ञांचा अंदाज आहे. त्या लोकांना युरोपात सर्वजण भटके किंवा जिप्सी म्हणून ओळखलं जातं.जगातील विविध देशांमध्ये मिळून जवळपास दोन कोटींपर्यंत ह्यांची लोकसंख्या आहे. अगदी दक्षिण युरोप पासून रशिया सर्बिया इंग्लंड हंगेरी अमेरिकेमध्ये राहणारे जवळपास 10 लाखांच्या वर रोमा लोक व त्यांच्यासोबत दक्षिण अमेरिकामध्ये राहणारे ब्राझील अर्जेंटिना आणि चिलीमधील स्पॅनिश भाषा बोलणारे रोमा लोक अशी प्रचंड भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता या लोकांमध्ये आढळते.
अर्जेंटिनाचे प्रसिद्ध कादंबरीकार लेखक व पत्रकार गॅब्रियल गॅरसिया मार्जेक यांच्या 100 इयर्स ऑफ सॉलिट्युड या कादंबरीत या जिप्सी लोकांचे मनोवेधक वर्णन येते. ह्या लोकांनीच जगभरात प्रवास करून एका खंडातील वस्तू दुसऱ्या खंडात नेऊन त्यांचा व्यापार सुरू केला. हे लोक नेहमीच एका गावातून दुसऱ्या गावात भटकत जात आणि सोबत तरेच्या वस्तू घेऊन हिंडत. आता हे लोक दुसरीकडून युरोपात आले त्यामुळे तिथल्या वंश्रेष्ठत्वाच्या आणि रंगावरून वर्णभेद करणाऱ्या परंपरेनुसार ह्या समाजांनाही काही अडचणींना आणि भेदभावाचा सामना करावा लागला. व तो आजही करावा लागतोय.
वेगळ्या रंगामुळे आणि संस्कृतीमुळे हे लोक युरोपियन समाजात एक दबलेले जीवन घेऊन जगत असतात. जिप्सी हा शब्द खरं तर नवे नवे शोध घेऊन येणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो. मात्र युरोपात याचा वापर यांच्यासाठी एखादी शिवी म्हणून केला जातो. या समूहासाठी कोणतीही सामाजिक सुरक्षा व योजना सरकारकडून राबवली जात नाही. त्यामुळेच या समूहातील दारिद्र्याचे व गरिबीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. हा समाज हंगेरी मधील सर्वात मोठा अल्पसंख्यांक समाज आहे. मात्र तरीही या समाजाकडे असणारे संपत्ती आणि शिक्षणाचे प्रमाण इतर समाजाच्या मानाने फारच मग आहे. एखाद्या भटक्या विमुक्त जमातीसारखे सर्वसामाजिक गुणविशेष या लोकांना जकडून ठेवत असताना. त्यांना जगातील पीडित वंचित लोकांसमोर आपले साधे धर्म जाणवले नाही तर नवलच.
टिबोर आणि जानोस या दोन माणसांनी आपलं जीवन ह्या समाजाच्या सेवेला वाहिलं टिबोर हे जगभरातील मानवी हक्कांच्या आणि दलित जनतेच्या एकूण अनुभवांवरती अभ्यास करतात त्याच्यासोबतच ते हंगेरीतल्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य देखील होते. या दोघांचाही एक दिवस अचानक आंबेडकरांच्या चळवळीशी आणि त्यांनी दलितांसाठी केलेल्या कामाची त्यांच्या क्रांतिकार्य जातीनिर्मूलक विचारांशी आला टिबोर यांना पॅरिस मधील एका रात्री अचानक आंबेडकरांचे पुस्तक सापडले. परक्या मुलखात कुणी आपला माणूस भेटावा असं त्यांना वाटल्याचं ते सांगतात विसाव्या शतकात.
आंबेडकरांनी दलितांच्या हक्कासाठी लढलेली लढाई आणि ते सध्या रोमा समाजासाठी लढत असणाऱ्या लढाईत यांना विलक्षण साम्य आढळले हा समाजही दलितांप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत फार मागे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या विद्यार्थ्यांना श्वेतवर्णीय पांढऱ्या कातडीच्या विद्यार्थ्यांसोबत एका वर्गात शिकू दिले जात नाही एक तर त्यांच्यासाठी शाळा किंवा मग वर्ग वेगळे भरवले जातात आणि अशा शाळांमध्ये मूलभूत सुविधा नळाचे पाणी देखील उपलब्ध नसते. दहा वर्षांपूर्वी तर त्यांना हॉटेलमध्ये खाण्यासाठी वेगळे कप वेगळी ताटे दिली जायची या समाजातील मुले म्हणूनच समाजातील एक दूषण घेऊन वावरत असत. त्यांना वेळोवेळी अपमानित केलं जातं अनेक देशांमध्ये रोमा हा शब्द चोर म्हणून वापरला जातो.
अनेक पर्यटन वेबसाईट वरती आजूबाजूच्या रोमा समाजाच्या मुलांपासून सावध रहा ते तुम्हाला लुटू शकतात याचा अर्थाचा मजकूर लिहिलेला आढळतो शहरात कुठेही चोरी झाल्यास बिनदिक्कतपणे रोमा समाजातील लोकांवरती त्याचा आळ ठेवला जातो. इतकंच काय तर हॉस्पिटलमध्येही रोमा समाजातील गर्भवती महिलांना वेगळे ठेवले जाते 2003 44 हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या जिप्सी लोकांसाठी एका वेगळ्या प्रसुतीगृहाची तरतूद केलेली. एका युरोपीय संस्थेला अभ्यासात आढळली. आंबेडकरांविषयी अजून माहिती मिळताच त्यांनी फ्रेंड्स ऑफ वर्ल्ड बुद्धिस्ट ऑर्डर या संघटनेतील काही मित्रांशी संपर्क केला. ही संघटना भारतातील नवबौद्ध लोकांसाठी गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. यातूनच स्टीबोर आणि जॉनीज यांनी जाणून त्यांच्या समवेत 2005 आणि 2007 महाराष्ट्राला भेट दिली.
येथील दलित जनतेशी त्यांचा खूप आपुलकीचे नातं असल्याचे त्यांना जाणवले हंगेरीत परतताच त्यांनी हा भावबंध जाणून घट्ट विणायला सुरुवात केली. आणि हंगेरीत जय भीम नेटवर्क या संस्थेची स्थापना करून त्यांच्या मार्फत त्यांनी रोमा समाजाला बुद्ध तत्वज्ञानाची व धम्माची दीक्षा दिली तसेच रोमा समाजातील लहान मुलांसाठी डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने हंगेरीत संयुक्झा ओईड हेगिमे या शहरांमध्ये शाळा सुरू केल्या जय भीम नेटवर्क आंबेडकरांच्या त्वज्ञानावर पूर्ण श्रद्धा ठेवते. त्यांच्या मताने समाजातील एक लहानसा घटक तरी विचारपूर्वक वागला तरी जग बदलण्याचा खूप मोठ्या कामी मोठी मदत होऊ शकते. या नेटवर्कच्या माध्यमातून भारतात दलित समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हंगेरी मध्ये बोलवले जाते. त्यांना रोमा समाजाशी संवाद साधवायला लावून हे बंध विणण्याचे सदोदित प्रयत्न केलाही जातो.
जय भीम नेटवर्कचे सध्याचे अध्यक्ष असणारे जानोस म्हणतात आम्ही धर्मांतर करूनही अजूनही भरपूर लोक आमचा तिरस्कारच करतात युरोपातील बुद्धिजम म्हणे खाऊन पिऊन सुखी असलेल्या मध्यमवर्गीय लोकांच्या चंगळवादाचं नाव आहे. मग हे भटके रोमा लोक बुद्धिस्ट कसे काय असू शकतील असा सवाल आम्हाला केला जातो. आमच्याकडे याचं एक साधं उत्तर आहे ते म्हणजे आंबेडकरांनी दिलेला बुद्ध धर्म आम्हाला सांगतो की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जे शिक्षण हंगेरीतल्या इतर शाळा आमच्या मुलांना देत नाही ते शिक्षण आम्ही या मुलांना देतो म्हणूनच आम्ही खरे बुद्धिस्ट आहोत .