आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा : Amcha Ladka Shetkari Yojana 2024

Amcha Ladka Shetkari Yojana 2024 आता आम्ही आमचा लाडका शेतकरी ही योजना सुरू करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आज बीडमध्ये राज्य सरकारने कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत या कार्यक्रमामध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली आहे.

Amcha Ladka Shetkari Yojana 2024

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण हे देणार आहेत मुळे आज मी त्यांच्या आधी बोलत आहे मी शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे काहीतरी मागणार आहे असेही शिंदे म्हणाले शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही ऑफिसमध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाही आम्ही बांधावर जातो असा टोलाही सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे शेतकऱ्यांवर दुसरे संकट येत असते जेव्हा नुकसान होतो तेव्हा आम्ही मदत करत असताना नियम बाजूला ठेवतो आमच्या महायुतीच्या सरकारने लगेच मदत देण्याचे काम सुरू केले आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.(Amcha Ladka Shetkari Yojana 2024)

Amcha Ladka Shetkari Yojana 2024 कांदा आणि दूध प्रश्नावर बैठक घेणार :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की एक रुपयात विमा योजना देणार हे राज्य पाहिले आहे किसान सन्मान निधी मधून केंद्र आणि राज्यातून आपण मोठा निधी दिला आहे शेतकऱ्यांना दिलेलं काहीही काढत नाही विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं ? आणि हे कधीही काढत नाही आज राज्यांमधील शेतकऱ्यांचा कांद्याचा आणि दुधाचा प्रश्न सोडवायचा आहे यासाठी तुम्ही थोडा प्रयत्न करा अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे केली. कापसाला आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला हेक्टरी 5000 आणि कापसाला पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेतोय यामध्ये दोन हेक्टर पर्यंत मर्यादा असेल अशी घोषणाही शिंदे यांनी केली आहे.

आपण साडेसात शेती पंपाच्या वीज बिले ही माफ करत आहे विरोधक मागच काय विचारत आहेत आम्ही पुढचं बिल घेणार नाही पुढचं का घेऊ सरकार आता यापुढे शेतकऱ्यांकडून वीज बिलाचे पैसे घेणार नाही असेही ते म्हणाले. Amcha Ladka Shetkari Yojana 2024

आधार कार्ड बँक खात्याला लिंक असलेल्या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे

Leave a Comment