Anudan E KYC 2024 जिल्ह्यामधील बारा हजार पाचशे आठ शेतकऱ्यांनी केवायसी केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झाले असतानाही शेतकऱ्यांना मिळाला नाही यासाठी गाव स्तरावरील तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या मार्फती केवायसी करण्यासाठी याआधी सुद्धा प्रयत्न केले होते तरीसुद्धा अजूनही शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे या सर्वांनी ई केवायसी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
Anudan E KYC 2024 जळगाव जिल्ह्यामधील सन 2022 पासून शेती पिकाच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत यानुसार दोन लाख 13 हजार 416 शेतकऱ्यांना शासन स्तरावरून डीव्हीडी प्रणाली द्वारे जवळपास २४४ कोटी रुपये अनुदान वाटप करण्यात आलेले आहे .
परंतु जिल्ह्यामधील बारा हजार पाचशे आठ शेतकऱ्यांनी केवायसी केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झाले असून सुद्धा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही यासाठी गाव स्तरावरील तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत ही केवायसी करण्यासाठी यापूर्वी सुद्धा प्रयत्न केले होते तरी देखील अजूनही शेतकऱ्यांनी ही केवायसी केले नसल्यामुळे अनुदान पासून वंचित आहेत.
Anudan E KYC 2024 जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांनाही केवायसी चे आवाहन :
जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये जिल्ह्यामधील भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा अमळनेर आणि जामनेर या तालुक्यांमध्ये अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी 5854 शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झाले असून सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा झालेले नाही.
Anudan E KYC 2024 तरी संबंधित शेतकऱ्यांनी महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन आपली केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे शेती पिकाच्या नुकसानीचे अनुदान लगेच प्राप्त करून घ्यावे असे आवाहन सर्व संबंधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.