Aushman bharat mofat upchar 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त भारतातील सर्व वयोवृद्ध नागरिकांना दिवाळी भेट म्हणून एक नवीन योजना सुरू केलेली आहे यामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सत्तर वर्ष किंवा 70 पेक्षा जास्त वयाच्या वृद्ध नागरिकांसाठी कोणतेही उत्पन्नाची अट न घालता कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिकांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार सुरू केलेले आहेत.
याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी केली आणि यामधून आता सर्व वयोवृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे सध्या नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड द्वारे पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार सुरू आहेत आणि यामध्येच आता कोणत्याही अटीशिवाय त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
Aushman bharat mofat upchar 2024 योजनेचे स्वरूप :
Aushman bharat mofat upchar 2024 प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ७० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्ध नागरिकांसाठी उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता कोणत्याही उत्पन्न गटातील वयोवृद्ध नागरिकांना मोफत शासकीय उपचार घेता येणार आहेत.
साठी त्यांना आयुष्मान भारत कार्ड काढावे लागणार आहे यामध्ये त्यांना पाच लाख रुपये पर्यंत स्वतंत्र उपचार उपलब्ध असणार आहेत यातील पात्र असलेले साडेचार कोटी कुटुंबातील सहा कोटी होऊन अधिक वयोवृद्ध नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे
या योजनेअंतर्गत नागरिकांना आयुष्मान भारत अंतर्गत स्पेशल कार्ड मिळणार आहे या कार्ड अंतर्गत ते यासाठी अर्ज करू शकणार आहेत आणि यामधून लाभ घेऊ शकणार आहे
पी एम किसान योजनेत नवीन नियमावली जारी ; पहा काय आहेत नवीन नियम
कसा करावा अर्ज :
आयुष्मान कार्ड जर तुमचे असेल तर त्यामध्ये तुम्हाला नवीन आयुष्मान कार्ड उपलब्ध होणार आहे यासाठी https://beneficiary.nha.gov.in/ या आयुष्मान भारत वेबसाईटला भेट द्यायचे आहे तिथे तुम्हाला सर्व कागदपत्रे जमा करून केवायसी अपडेट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड योजनेअंतर्गत याचा लाभ मिळणार आहे.