Cabinet Baithak 2024 महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाही शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुमारे एक कोटी साठ लाख भगिनींना 4787 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेट मंत्री प्रत्यक्ष उपस्थित होते तर ब्रान्कायटिसची लागण झाल्याने मुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन हजेरी लावली.
Cabinet Baithak 2024 कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतील संक्षिप्त निर्णय :
- सार्वजनिक बांधकाम – छत्रपती संभाजी नगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा केली जाणार
- पशुसंवर्धन विभाग – अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
- वस्त्रोद्योग विभाग – शेवगाव तालुक्यामधील सहकारी सूतगिरणी साठी अर्थसहाय्य
- कृषी विभाग – बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले जाणार विहीर शेततळे वीज जोडणी साठी भरीव अनुदान
- महिला आणि बाल विकास – अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार 36000 पेक्षा जास्त केंद्र प्रकाशमान होणार
- कामगार विभाग – औद्योगिक कामगार न्यायालय मधील न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित पत्ते
- पशुसंवर्धन विभाग – थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ
- जलसंपदा विभाग – धारूर तालुक्यामधील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
- विधी व न्याय विभाग – काटोल आरवी येथे वरिष्ठ दिवानी न्यायाधीश न्यायालय पैठण गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वातंत्र्य जिल्हा Cabinet Baithak 2024
कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर संक्षिप्त निर्णय :
- मदत व पुनर्वसन – मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमुळे कोणत्याही अन्य योजना बंद होणार नाहीत शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे
- कृषी विभाग – राज्यात 121 टक्के पेरण्या पूर्ण
- जलसंपदा विभाग – राज्यामधील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच शंभर टक्के भरले आहेत
- महिला व बालकल्याण – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण एक कोटी साठ लाख महिलांना 4787 कोटींचे वाटप