E Pik Pahani 2024 आज आपण आपल्या या लेखामध्ये ई पीक पाहणी यादी कशी तयार करायची आणि त्याचे फायदे आणि कोणासाठी आवश्यक आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
ई पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकांची नोंद सात बारा उतारा वर ऑनलाईन पद्धतीने करणे होय महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी सुरू केला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता येतो यावर्षी खरीप हंगामासाठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्वतः पीक पाहणी करू शकतील त्यानंतर 16 सप्टेंबर पासून तलाठी स्तरावर नोंदणी सुरू होतील. E Pik Pahani 2024
E Pik Pahani 2024 आवश्यक ॲप :
पाहणी करण्यासाठी ई पीक पाहणी हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप सर्च करून इन्स्टॉल करायचे आहे यामधील आवश्यकता तपशील भरण्यासाठी शेतकरी आपले नाव सातबारा उताऱ्यावर असलेले पीक जमिनीचे क्षेत्रफळ इत्यादी माहिती या ॲपमध्ये भरू शकतात.
ई पीक पाहणी चे फायदे :
- शेतकऱ्यांनी जर आपला शेतमाल किमान आधारभूत किमतीवर विकायचा असे ठरवले तर ई पीक पाहणी मधील माहिती वापरून सरकारला मदत होते
- कर्ज घेतलेल्या पिकांची नोंद असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेली माहिती बँकांसाठी पडताळणीसाठी उपयुक्त ठरते
- पिकांच्या विम्यासाठी अर्ज करत असताना नोंदवलेले पीक आणि ई पीक पाहणी तील नोंदवलेले पीक एकसारखे असणे आवश्यक आहे फरक आढळल्यास ई पीक पाहणी तील नोंद अंतिम मानली जाते
- नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी ई पीक पाहणी ची नोंद नुकसान भरपाई मिळवण्यासाठी उपयुक्त आहे
E Pik Pahani 2024 कोणती अट रद्द केली आहे ?
E Pik Pahani 2024 कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले हेक्टरी 5000 रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी इ पीक पाहणी करण्याची अट सरकारने रद्द केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की सातबारा उताऱ्यावर नोंद असलेले शेतकऱ्यांना देखील या अनुदानाचा लाभ मिळणार आहे परंतु अन्य सर्व योजनांसाठी ई पीक पाहणी नोंद गरजेचे आहे.
ई पीक पाहणी साठी अर्ज कसा करावा ?
- ई पीक पाहणी यादी मध्ये नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील प्रक्रिया फॉलो करायचे आहे
- सर्वप्रथम ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहे
- हे ॲप डाऊनलोड करून झाल्यानंतर आपले स्वतःचे खाते तयार करायचे आहे
- त्यानंतर या ॲपमध्ये पिकांची सर्व नोंद करून घ्यायची आहे
- पिकांचे सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे
- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई पीक पाहणी यादी तयार होते आणि शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद होते E Pik Pahani 2024