Kadaba Kutti Anudan Yojana Arj 2024 महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना सुरू करत असते याचा फायदा बरेच शेतकरी घेत असतात तर काही शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ कसा घ्यावा याबद्दल काहीच माहिती नसते त्यामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात.
महाराष्ट्र सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे त्यामार्फत तुम्ही सर्व शेती अवजारे तसेच इतर सुविधांचा सर्व शेतकरी फायदा घेऊ शकतात. यामध्ये भेदभाव केला जात नाही आपण आज मनुष्य चलीत कडबा कुट्टी मशीन ची सध्या 50% अनुदानावर अर्ज केल्यानंतर मिळू शकते यासाठी सर्व शेतकरी अर्ज करू शकतात.
Kadaba Kutti Anudan Yojana Arj 2024 पात्रता काय आहे ?
- 10 एकर पेक्षा कमी जमीन क्षेत्र आहे असे शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात
- अनुसूचित जाती आणि जमाती मधील सर्व शेतकरी अर्ज करू शकतात
किती अनुदान मिळते ?
- महिला शेतकरी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना 20000 पर्यंत अनुदान दिले जाते
- 20000 रुपये म्हणजेच जवळजवळ 50% अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते
- जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत त्यांना 16,000 रुपये एवढे अनुदान दिले जाते
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा व आठ अ उतारा
Kadaba Kutti Anudan Yojana Arj 2024 अर्ज कुठे करावा ?
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी च्या अधिकृत वेबसाईट : https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login ला भेट द्यावी लागणार आहे
- या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे लॉगिन आयडी तसेच आधार व्हेरिफिकेशन ओटीपी पत्ता जमिनीचे क्षेत्र बँक पासबुक आणि सिंचन सुविधा ही सर्व माहिती भरायची आहे त्यानंतर तुमची प्रोफाईल 100% पूर्ण होईल.
- त्यासमोर अर्ज करा असा पर्याय दिसेल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडावा यामध्ये ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलीत अवजारे किंवा मनुष्य चलीत हे निवडावे लागेल.
- त्यानंतर एचपी श्रेणी निवडायची आहे
- HP श्रेणी निवडल्यानंतर उपकरण यामध्ये फॉरेस्/ ग्रास अँड स्ट्रो/ कटर/ हा पर्याय निवडायचा आहे
- त्यानंतर मशीन प्रकार मध्ये कडबा कुट्टी हे सर्व निवडून अर्ज सबमिट करायचा आहे