शेतामध्ये कांदा लागवड करायची आहे ? कांदा लागवड विषयी संपूर्ण माहिती : Kanda Lagavad 2024

Kanda Lagavad 2024 कांदा लागवडीसाठी आवश्यक जमीन कशाप्रकारे असावे, कांद्याचे विविध वाण कोणते, रासायनिक खते रोग आणि किडे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हालाही कांद्याची लागवड कशी करावी याबद्दल माहिती हवी असेल तर आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. यामध्ये आज आपण कांदा लागवड कशी करावी याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात कांदा लागवड कशी करावी.

Kanda Lagavad 2024

कांदा पिके व्यापाराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे पीक मानले जाते. कांदा पिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य हे अग्रस्थानी असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. एक लाख हेक्टर जमिनीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये पुणे नाशिक सोलापूर जळगाव धुळे अहमदनगर आणि सातारा हे जिल्हे कांदा पिकवण्याच्या बाबतीत अधिक प्रसिद्ध आहेत. याबरोबरच मराठवाडा विदर्भ आणि कोकण या जिल्ह्यांमध्ये सुद्धा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्र मध्ये नाशिक जिल्हा येत नाही तर संबंधित भारतामध्ये कांदा पिकवण्याबाबत प्रसिद्ध आहे. एकूण उत्पादनापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सदस्य आणि भारतामधील दहा टक्के कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

कांदा लागवडीसाठी योग्य हवामान :

कांद्याची लागवड हेक्टरी मुख्यतः हिवाळी हंगामामध्ये पीक असते परंतु महाराष्ट्रातील, सौम्य हवामानामध्ये कांद्याचे साधारणपणे दोन ते तीन पिके घेतली जातात. कांदा लागवड केल्यापासून साधारणपणे एक ते दोन महिने थंड हवामान लागते. कांद्याची वाढ होत असताना तापमानामध्ये झालेली वाढ ही कांदा पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त अशी असते.

Kanda Lagavad 2024

कांदा लागवडीसाठी जमीन कशी असावी ?

Kanda Lagavad 2024 कांदा लागवड करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जमीन. जमिनी योग्य असेल तर कोणतेही पीक मोठ्या प्रमाणात येण्यास मदत होते. त्यामुळे सर्व पिकांची लागवड करत असताना योग्य असणारी गोष्ट म्हणजे ही जमीन आहे. कांदा पिकाचे लागवड घेत असताना जमीन ही पाण्याचा निचरा असणारी तसेच या जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असलेला अशी जमीन कांदा पिकासाठी अत्यंत उपयुक्त असे असते. कांद्याची लागवड करत असताना जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे.

जमिनीची पूर्व मशागत :

कांद्याची लागवड करण्याआधी जमिनीची उभी आडवी नांगरणी करणे आवश्यक असते. या जमिनीला कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीमध्ये असणारे सर्व मातीचे ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी लागते. कांद्याची लागवड करण्याआधी जमिनीमध्ये 40 ते 50 शेणखत मिसळणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जमिनीची कांदा लागवड करण्याआधी पूर्वमशागत केल्यामुळे कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात येण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाप्रकारे जमिनीची पूर्व मशागत केल्याने जमिनीमध्ये कांद्याचे उत्पादन जास्त प्रमाणात येऊ शकते.(Kanda Lagavad 2024)

कांदा लागवडीकरिता उपयुक्त वाण कोणते ?

कांदा पिकांच्या लागवडीसाठी उपयुक्त वाण कोणते आहे ? याबद्दल सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया कांदा लागवडीसाठी उपयुक्त वाण कोणते आहे.

बसवंत 780 :

Kanda Lagavad 2024 बसवंत ही कांद्याची जात मुख्यतः रब्बी हंगामासाठी योग्य मानले जाते. कांदा पिकाच्या बसवंत जातीचा रंग हा गडद लाल असतो. या जातीचे कांदे आकाराने मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात. ही जात साधारणपणे शंभर ते 110 दिवसांमध्ये तयार होते. बसवंत जातीचे हेक्टरी उत्पादन हे 250 ते 300 क्विंटल या प्रमाणात मिळते. कांदा पिकाची बसमध्ये ही जात उपयुक्त असल्याने या जातीपासून कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येते.

एन 53 :

Kanda Lagavad 2024 कांदा पिकाची एन 53 ही जात साधारणतः खरीप हंगामासाठी योग्य प्रकारे मानले जाते. या कांदा पिकाची जात 100 ते 150 दिवसांमध्ये तयार होते. या जातीचा रंग सर्वसाधारणपणे लाल भडक असतो. कांदा पिकाच्या या जातीमधून हेक्टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल घेण्यास मदत होते. तसे ही जात खरीप हंगामासाठी जास्त प्रमाणात उपयुक्त अशी मानली जाते.

Kanda Lagavad 2024

एन -2-4-1 :

Kanda Lagavad 2024 एन -2-4-1 ही कांदा पिकाची जात सर्वसाधारणपणे रब्बी हंगामासाठी योग्य मानली जाते. या जातीच्या कांद्याचे रंग भगवा व विटकरी अशा प्रकारे असतो. या जातीचे कांदे आकाराने मध्यम गोल प्रकारचे असून साठवणुकीच्या बाबतीत हा कांदा अतिशय चांगल्या प्रकारे जास्त दिवस टिकणारा असतो. ही जात सर्वसाधारणपणे 120 ते 130 दिवसांमध्ये तयार होते. या जातीपासून हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते. या जातीचे कांदे साठवणुकीच्या बाबतीमध्ये जास्त दिवस टिकणारे असतात त्यामुळे या जातीला जास्त प्रमाणात मागणी मिळते.

पुसा रेड :

पुसा रेड ही कांद्याची एक प्रकारे उत्तम जात समजली जाते. या जातीच्या कांद्यांचा रंग लाल विटकरी अशा प्रकारचा असतो. तसेच या कांद्यांचे आकार मध्यम व गोलाकार प्रकारचे असतात. या जातीचे कांदे साधारणतः मध्यम तिखट स्वरूपाचे असतात. या जातीची लागवड केल्यापासून साधारणपणे 120 दिवसांमध्ये तयार होण्यास कालावधी लागतो. या प्रकारच्या जातीपासून एक तरी उत्पादन आणि 250 ते 300 क्विंटल मिळते .संपूर्ण माहिती : Kanda Lagavad 2024

बियाण्यांचे प्रमाण :

कांद्याची लागवड करण्यासाठी हेक्टरी दहा किलो बियाणे उपयुक्त किंवा पुरेसे असतात. हेक्‍टरी कांद्याची लागवड करण्यासाठी दहा किलो बियाणे उपयोग असल्यामुळे, कांद्यांची लागवड करताना योग्य कांद्याच्या जातीची निवड करणे आवश्यक असते.

कांदा लागवडीची योग्य पद्धत :

  • कांदा लागवड करण्यासाठी गादीवाफे कांद्याची रोपे तयार करणे आवश्यक असते. तसेच जमिनीची खोल नागरण करून गरजेचे असते त्यामुळे जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते.
  • तयार करताना एक मीटर रुंद आणि पंधरा सेंटीमीटर लांब उंच अशा प्रकारे करावे.
  • कांदा लागवड करत असताना वाफ्यांमधील मातीचे ढेकळे बाजूला करणे गरजेचे आहे. वाफ्याच्या रुंदीशी समांतर असे पाच सेंटीमीटर बोटाने रेषा पाडाव्या लागतात.
  • आणि यामध्ये ओळीत बी पेरावे लागतात व नंतर मातीने झाकून टाकावे लागतात.
  • हे बी उगवून येईपर्यंत यांना झारीने पाणी घालावे लागते. हे बी उगवून आल्यानंतर रोपांना आवश्यकतेनुसार पाटाने पाणी देणे गरजेचे आहे.
  • कांद्यांची रब्बी हंगामातील रोपे आठ ते नऊ आठवड्यांनी तयार होतात आणि खरीप कांद्याची रोपे सहा ते सात आठवड्याने तयार होतात.
  • जर रोपांना गाठ तयार झाली असेल तर रोपे लागवडीसाठी योग्य आहेत असे समजावे.
  • कांद्यांची रोपे काढण्याआधी 24 तास आधी गादीवाफ्यांना पुरेसे पाणी देणे आवश्यक असते. कांद्याची लागवड गादीवाफ्यांवरती तसेच सरी वरंबावर करता येऊ शकते.
  • कांद्यांची लागवड सपाट वाफ्यांमध्ये एकरी रोपांचे प्रमाण जास्त असल्यास मध्यम आकाराचे किंवा एकसारखे कांद्याचे उत्पादन मिळते.
  • कांद्यासाठी दोन मीटर रुंद व सपाट वाफा उताराप्रमाणे ठेवणे गरजेचे असते.
  • कांद्याच्या रोपांची लागवड संध्याकाळी किंवा सकाळी करावे लागते.12.5 बाय 7.5 सेंटीमीटर अंतरावरती करावी लागते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

कांदा पिकांसाठी 50 किलो नत्र प्रती हेक्‍टरी, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी देणे आवश्यक असते. लागवडीनंतर साधारणपणे एक महिन्याने 50 किलो नत्र प्रती हेक्‍टरी देणे गरजेचे असते. कांदा पिकासाठी नियमित पाणी देणे महत्त्वाचे असते.

दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क देण्यास 3 कोटी 70 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता

कांदा लागवड बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Ashish Vidhate

FAQ

कांदा लागवड करण्यासाठी जमीन कशी असावी लागते ?

जमीन पाण्याचा निचरा असणारी तसेच या जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असलेला अशी जमीन कांदा पिकासाठी अत्यंत उपयुक्त असे असते. कांद्याची लागवड करत असताना जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे.

कांदा लागवडीसाठी योग्य खत व्यवस्थापन कसे असावे ?

कांदा पिकांसाठी 50 किलो नत्र प्रती हेक्‍टरी, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश लागवडीच्या वेळी देणे आवश्यक असते. लागवडीनंतर साधारणपणे एक महिन्याने 50 किलो नत्र प्रती हेक्‍टरी देणे गरजेचे असते. कांदा पिकासाठी नियमित पाणी देणे महत्त्वाचे असते

जमिनीची पूर्व मशागत का करावी ?

जमिनीची पूर्व मशागत केल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी फायदा होतो

Leave a Comment