Kapus Ani Soyabean Anudan 2024 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा केले जाणार अशी सूचना धनंजय मुंडे यांनी केले आहेत. परंतु पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा गोंधळ कायम आहे ई पीक पाहणी ची अट कायम असल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
2023 च्या खरीप हंगामामध्ये ही पीक पाहणी करूनही सातबारा वरती सोयाबीन कापूस पिकांची नोंद झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नाव अनुदान यादी मध्ये आली नाही अशी तक्रार शेतकरी करत होते या पार्श्वभूमीवर ती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी मधील कार्यक्रमांमध्ये भाषण करताना ई पीक पाहणी नोंदणीची अट रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर ई पीक पाहणी अट रद्द करण्याची घोषणा केली मात्र अनुदान कार्यपद्धतीच्या शासन निर्णयामध्ये ई पीक पाहणी अट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Kapus Ani Soyabean Anudan 2024 कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची सूचना :
कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10 सप्टेंबर पासून जमा करा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहेत अनुदान वाटप करताना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज विशेष बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये त्यांनी या सूचना केल्या आहेत परंतु पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे.
Kapus Ani Soyabean Anudan 2024 सोयाबीन उत्पादकांना अनुदान देण्याची कार्यपद्धती शासनाने 30 ऑगस्ट रोजी जाहीर केली होती परंतु तरीही अडचणी कायम आहेत अनुदान वाटप करताना येणाऱ्या या अडचणी सोडवण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सूचना केलेल्या आहेत या बैठकीला कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.