Kapus Soyabean Anudan 2024 राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5000 रुपयांचे अनुदान 30 सप्टेंबर रोजी वाटप केले होते राज्यांमधील एकूण 96 लाख खातेदारांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये या अनुदानाचे वाटप केले जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 49 लाख 51 हजार खातेदारांना या अनुदानाचा लाभ मिळाला होता.
दरम्यान पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 2398 कोटी रुपयांचे वाटप 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना करण्यात आले होते तर त्यानंतरच्या दहा दिवसांमध्ये म्हणजेच 10 ऑक्टोंबर पर्यंत राज्यांमधील एकूण 2564 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
Kapus Soyabean Anudan 2024 सोयाबीन उत्पादन करणारे 45 लाख 25 हजार खातेदार म्हणजेच 33 लाख 39 हजार शेतकरी आणि कापूस उत्पादित करणारे 22 लाख 37 हजार खातेदार म्हणजेच एकूण 20 लाख 26 हजार शेतकऱ्यांना असे एकूण 67 लाख 61 हजार खातेदार आणि 57 लाख 65 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 2564 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
Kapus Soyabean Anudan 2024 काय आहे अडचणी ?
Kapus Soyabean Anudan 2024 पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही अनुदान खात्यावरती जमा झाले नाही तर अनेक संयुक्त खातेदारांच्या ही खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत वैयक्तिक आणि संयुक्त खातेदारांनी आपापले आधार संमती पत्र कृषी सहायकाकडे दिल्यानंतर अनुदानाचा लाभ घेता येणार आहे तर संयुक्त खातेदारांसाठी सामायिक क्षेत्रांमध्ये नाव असणाऱ्या सर्वांच्या साक्षरता असणे आवश्यक आहे तर एकाच व्यक्तीच्या नावे पैसे जमा केले जाणार आहेत परंतु कुणाच्या नावावरती किती क्षेत्र आहे त्यानुसार संयुक्त खातेदारांनी एकमेकांमध्ये ठरवून वाटप करायचे आहे.
आतापर्यंत एकूण करण्यात आलेली वाटप :
- खातेदार – 67 लाख 61 हजार
- शेतकरी – 57 लाख 65 हजार
- रुपये वाटप – 2564 कोटी रुपये