सोयाबीन काढून ज्वारीची पेरणी ; आता खरिपातील सोयाबीन पीक पाहणी कशी करायची ? Kharip E Pik Pahani 2024

Kharip E Pik Pahani 2024 राज्यांमधील खरीप पिकांची अनेक भागांमध्ये काढणी सुरू असून पीक विमा आणि अनुदानासाठी महत्त्वाची असणारी ई पीक पाहणी ला मुदतवाढ देण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे राज्यांमधील अनेक भागातील ई पीक पाहणी बाकी होते त्यामुळे इपिक पाहण्याची अट आता 26 ऑक्टोंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे परंतु मराठवाड्यातील अनेक भागात सोयाबीन काढून ज्वारीच्या पेरण्या सुरू झाले आहेत.

Kharip E Pik Pahani 2024

राज्यामध्ये एक ऑगस्ट पासून ते 15 सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती तर 15 सप्टेंबरपर्यंत राज्यांमधील शेतकरी पातळीवर आणि तलाठी पातळीवर एक कोटी 20 लाख हेक्टर वरील क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे त्यापैकी 79 लाख शेतकरी आणि 5000 शेतकऱ्यांची ई पीक पाहणी तलाठी स्तरावर करण्यात आली या क्षेत्रावरील एकूण खातेदार संख्या ही दोन कोटी 26 लाख एवढी होती.

Kharip E Pik Pahani 2024 :

विशेष म्हणजे मराठवाड्यामधील लवकर पेरण्या झालेल्या बीड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी पूर्ण केली आहे तर रब्बी ज्वारीची पेरणी देखील करून झाली आहे अशा तलाठी स्तरावर होत असल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान राज्यामध्ये यावर्षी एक कोटी 45 लाख हेक्टरवर पेरणी सुरू झाले आहेत तर 15 सप्टेंबरपर्यंत राज्यांमधील फक्त एक कोटी 20 लाख हेक्टर वरील ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे उर्वरित 25 लाख हेक्टर वरील ई पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे परंतु ही ई पीक पाहणी तलाठी स्तरावर केली जाणार आहे. Kharip E Pik Pahani 2024

कोकण व मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी

Leave a Comment