Ladki Bahin Yojana Navin Niyam 2024 महाराष्ट्र सरकारने राज्यांमधील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहेत जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे राज्य सरकारने काही दिवसापूर्वी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती.
आता राज्य सरकारने यासंदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर केले जातील असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे महिला आणि बालविकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana Navin Niyam 2024 काय आहे राज्य सरकारचा निर्णय ?
महिला आणि बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल शासन निर्णय जाहीर केला आहे या शासन निर्णयाप्रमाणे लाडकी बहीण योजनेसाठी दाखल होणाऱ्या अर्जांना मंजुरी देण्याची जबाबदारी फक्त अंगणवाडी सेवकेंवर असेल यापूर्वी या योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम 11 प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते परंतु आता फक्त अंगणवाडी सेविका अर्जांना मंजुरी देऊ शकतात.
Ladki Bahin Yojana Navin Niyam 2024 याआधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नागरी आणि ग्रामीण भागामधील बालवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका समूह संघटक सीआरपी आणि मुदत कक्ष प्रमुख, सी एम एम, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना होते परंतु नव्या शासन निर्णयानुसार आता फक्त अंगणवाडी सेविका अर्ज मंजूर करू शकतात.
मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले होते संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावावरती ती सर्ज दाखल केले होते यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेमध्ये गैरप्रकार पुन्हा होऊ नये यासाठी राज्य सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे समोर येत आहे आता या योजनेमधील सप्टेंबरमधील अर्जांना फक्त अंगणवाडी सेविका मंजुरी देऊ शकतात.
किती महिलांना मिळाला या योजनेचा लाभ ?
Ladki Bahin Yojana Navin Niyam 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात एक कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटीचा लाभ देण्यात आलेला आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू असणार आहे.