मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कुठे करावा ? काय आहे ते योजनेच्या अटी ? Magel Tyala Shet Tale Yojana Arj 2024

Magel Tyala Shet Tale Yojana Arj 2024 महाराष्ट्र मधील कित्येक नागरिकांची उपजीविका ही पूर्णपणे शेती वरती अवलंबून आहे बहुतांश भागांमधील कोरडवाहू शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते सध्याच्या पावसाच्या अनिश्चित त्यामुळे कित्येक वेळा दुबार पेरणी किंवा आलेली पीक जळून जाण्याचा प्रकार घडून येतो या पाणीटंचाई वरती मात करण्यासाठी शेततळे हे अत्यंत उपयुक्त आहे.शेततळे तयार करण्यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता महाराष्ट्र शासन पुढे आलेले आहे शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.

Magel Tyala Shet Tale Yojana Arj 2024

शेततळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरली आहे.आर्थिक मदत मिळाल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी शेततळ्याचा पर्याय अवलंबतील परिणामी मोठ्या प्रमाणात पाण्याचे संवर्धन केले जाईल आणि शेतीचे पाण्याविना होणारे नुकसान देखील टाळले जाणार आहे राज्यामधील नागरिकांना शेतीकडे आकर्षित आणि प्रोत्साहित करणे तसेच शेतकऱ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करून त्यांचे राहणीमान सुधारणे ही देखील शासनाची उद्दिष्टे आहेत मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत ही उद्दिष्टे पूर्ण होण्यास नक्कीच मदत होणार आहे

Magel Tyala Shet Tale Yojana Arj 2024 अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा :

या योजनेअंतर्गत राज्यांमधील पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यामधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे शेतकरी आपल्याकडे उपलब्ध जमिनीुसार तसेच आपल्या गरजेनुसार शासनाच्या नियमावलीनुसार आपल्याला हव्या त्या आकारांमधील शेततळे तयार करू शकतील.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल या योजनेसाठी दारिद्र्यरेषेखालील शेतकरी तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्राधान्य देण्यात येईल यानंतर जेष्ठता इत्यादी तसेच प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य या निकषांवरती लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

जागेची निवड :

जमिनीमधून पाणी बाजारण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी मुरमाड, तालुका मुळे आणि सचित्र खडक अशी जमीन असलेली जागा शेततळ्यासाठी निवडू नये शेत तळायला लागणारी जागा ही शेतकऱ्यांनी स्वखुशीने व विनामूल्य द्यावी.

शेततळ्याचे प्रकार :

  • नैसर्गिक घाल अथवा उघड अडवून
  • सपाट जमिनीतील शेततळे

Magel Tyala Shet Tale Yojana Arj 2024 नियम व अटी काय आहेत ?

  • Magel Tyala Shet Tale Yojana Arj 2024 लाभार्थी शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • तसेच कृषी विभागाचे अधिकारी यांनी निश्चित केलेले ठिकाणी आणि निश्चित केलेल्या आकारानुसार शेततळे असावे
  • शेततळे तयार करण्याचा आदेश मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत हे काम पूर्ण करणे
  • शेतकऱ्याने आपल्या सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे
  • शेतीच्या बांधावर आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतीची लागवड करणे
  • शेततळ्याच्या कामासाठी शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मिळणार नाही
  • तसेच शेत शेततळ्यातून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करणे अपेक्षित
  • या योजनेमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पिकांना देखील नवसंजीवनी मिळणार

सिंचन योजनांची 132 कोटींची कर्जमाफीसाठी मान्यता

Leave a Comment