Maza Ladka Shetkari Yojana 2024 मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि आता माझा लाडका शेतकरी योजनेच्या घोषणांनी महाराष्ट्र मधील शेतकरी आणि महिला वर्गामध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे परळी तालुक्यातील कृषी महोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली आहे या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये आणि सामान्य जनतेत मोठी उत्सुकता आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या महोत्सवात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि महिलांना कशाप्रकारे लाभ मिळणार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Maza Ladka Shetkari Yojana 2024 योजना चे मुख्य उद्दिष्ट आणि फायदे :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी सुरु करण्यात आली होती या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून 3000 रुपयांचा हप्ता दिला जातो हा हप्ता दोन टप्प्यात दिला जातो प्रत्येक टप्प्यात 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होतात महिलांनी जर आठ तास काम केले तर त्यांना या योजनेअंतर्गत मानधन मिळते हे मानधन सहा महिन्यांसाठी दिले जाते आणि यामुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते.
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा :
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत मिळू शकते शासनाच्या निर्णयानुसार हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाची भरपाई होण्यास मदत होईल तसेच त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल.
ठिबक सिंचन आणि यांत्रिकीकरण योजनेचे लाभ :
यासाठी ठिबक सिंचन योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना देखील राबविण्यात येत आहे ठिबक सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 35 टक्के आणि 25% हप्ता म्हणून आर्थिक सहाय्य दिले जाते हे सर्व हप्ते सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कार्य अधिक सुलभ होते. (Maza Ladka Shetkari Yojana 2024)