Milk Subsidy 2024 : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलाचादायक निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयांच्या अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. राज्यातील उत्पादकांना दिलासा देण्यासाठी मागील काही महिन्यापूर्वी पाच रुपयांच्या अनुदान देण्याचा निर्णय देण्यात आलेला होता.
प्रतिलिटर किती दर दुधाला मिळणार आहे ?
- राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी पाच रुपयांच्या अनुदान निर्णय काही महिन्यापूर्वी घेतलेला होता .
- सदर दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करून ते सात रुपये देण्यात येईल दूध उत्पादकांना दूध संघाने 3.5 फॅट ८.५ एसएमएस या प्रतिकरित्या एक ऑक्टोंबर 2024 पासून 28 रुपये प्रति लिटर दूध दर देणे बंधनकारक राहणार आहे.
- दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा व त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सहजरित्या करता यावा व दूध उत्पादक क्षेत्रांमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रतिलिटर दुधाचा दर वाढवण्यात येणार आहे.
- तसेच सात रुपये शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे जर दुधाचे दर कमी असतील तर शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना भरपूर तोटा होतो.Milk Subsidy 2024
- व याच अनुषंगाने राज्य शासनाने आता सात रुपये अनुदान दूध उत्पादकांना देण्याचे ठरवलेले आहे एक ऑक्टोंबर पासून हा निर्णय दूध उत्पादकांना लागू होईल.
1 ऑक्टोंबर 2024 पासून देण्यात येणार अनुदान….
दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रति लिटर त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येतील .त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 35 रुपये भाव यापुढे मिळणार आहे .ही योजना एक ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येईल. मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल या योजनेसाठी 965 कोटी 24 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.Milk Subsidy 2024