महाराष्ट्रातील युवक युवतींना मोफत ड्रोन प्रशिक्षण ; असा करा अर्ज : Mofat Drone Traning 2024

Mofat Drone Traning 2024 बीड छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था प्रायोजित शेतकरी व युवक युवतींना परभणी आणि राहुरी येथील कृषी विद्यापीठातून रोड पायलटचे निशुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Mofat Drone Traning 2024

सदरील प्रशिक्षण कालावधी सात दिवसाचा आणि 180 दिवसाचा अशा दोन प्रकारात आहे प्रशिक्षणासाठी 20 सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जातील छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीतील माननीय ठरावानुसार राज्यातील मराठा कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजातील शेतकरी युवक युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यानुसार शेतकरी युवक-युवती यांच्याकडून 20 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर 23 सप्टेंबर पर्यंत सारथी संस्थेला सर्व कागदपत्रे पाठवावे लागणार आहेत.त्यामुळे युवक युवतींनी वेळेवरती अर्ज दाखल करावे लागणार आहे त्या संबंधित सर्व माहिती किंवा इतर सूचना ही लिंक वरती प्रसिद्ध केले आहे शेतकरी युवकांनी या लिंक वरती जाऊन नोंदणी करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. Mofat Drone Traning 2024

दरम्यान कृषी क्षेत्रामध्ये द्रोण चे महत्व वाढू लागले आहे ड्रोनच्या माध्यमातून पिकावर फवारणी केली जाते तसेच पुढील काळात ड्रोनचा वापर विविध कामासाठी केला जाऊ शकतो त्यामुळे युवकांना ड्रोनचे प्रशिक्षण भविष्यात नक्कीच लाभदायक ठरणार आहे.

Mofat Drone Traning 2024 या प्रशिक्षणासाठी पात्रता काय आहे ?

  • लाभार्थी अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी मराठा, कुणबी, मराठा कुणबी या प्रवर्गातील असावा
  • त्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखां पेक्षा अधिक असू नये
  • सात दिवस प्रशिक्षणासाठी अर्जदार किमान 12 वी उत्तीर्ण असावा
  • 180 दिवसीय प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इन एग्रीकल्चर प्रशिक्षणासाठी अर्जदार हा किमान विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असावा
  • यापूर्वी सारथी पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा लाभ घेतला नसावा

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार फवारणी पंप

Leave a Comment