Mofat Gas Cylinder Yojana 2024 राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकार तर्फे मोफत गॅस सिलेंडर मिळवायचा असेल तर काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे योग्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या योजनेअंतर्गत महिलांना लाभ मिळणार आहे.
राज्यामध्ये लोक कल्याणकारी योजना म्हणून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यांमधील पात्र महिलांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच या योजनेचा लाभ फक्त प्रधानमंत्री उज्वला योजनेमध्ये सामील असलेल्या लाभार्थ्यांना असलेला जाणार आहे या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत आणि प्रत्येक सिलेंडर साठी 830 अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
परंतु लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या अनुदानाची रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे त्यामुळे ज्या महिलांनी अद्यापही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे अन्यथा मोफत गॅस सिलेंडरचा लाभ त्यांना मिळणार नाही.
Mofat Gas Cylinder Yojana 2024 महिलांच्या हितासाठी महत्वपूर्ण योजना :
महिलांना आर्थिक सवलत देण्यासाठी राज्य सरकारद्वारे विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे त्यासाठी लाभार्थ्यांनी पहिल्यांदा गॅस सिलेंडर स्व खर्चाने खरेदी करावा लागणार आहे त्यानंतर सरकारकडून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.