Navin Vihir Khodkam Anudan 2024 नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत पाच एचपी सौर ऊर्जा पंप योजना संदर्भातील सर्व माहिती जाणून घेणार आहोत.शेती व्यवसायामध्ये पाणी हा घटक महत्त्वाचा असतो पाणी जर असेल तर जमिनीची प्रत थोडे हलकी जरी असली तरी त्यामध्ये चांगले उत्पन्न घेता येते. शेतकऱ्यांचे शेतीमधील उत्पन्न वाढावे यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत पाच एचपी सौर ऊर्जा पंप या योजनेचा उद्देश असा आहे की शेती शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी.
Navin Vihir Khodkam Anudan 2024 विहीर खोदकाम अनुदान सोबत पाच एचपी सौर ऊर्जा पंप :
तुमच्याकडे जर शेती असेल तर शेतामध्ये विहीर खोदून पिकांसाठी पाण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. सध्या प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढली असून पिकांना पाणी देण्यासाठी विहीर खोदणे शेतकऱ्यांसाठी परवडणारे नसते. अशावेळी तुम्ही विहीर खोदकामासाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेऊ शकता.
शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर खोदणे किंवा बोरवेल घेणे आणि त्या विहिरीवर किंवा बोरवेल वर पाणी उपसा करण्यासाठी सौर पंप बसवणे यासाठी खालील पद्धतीने अनुदान दिले जाते.
योजनेची संपूर्ण माहिती :
योजनेचे नाव : बोरवेल किंवा विहीर करतो पाच HP सौर पंपा सहित
योजनेचा उद्देश : ज्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वन हक्क कायदा अंतर्गत वन पट्टे मिळाले आहेत अशा शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन विहीर करणे आणि त्यावर सौर ऊर्जा पंप बसवले.
योजनेसाठी निधी : 1800 लक्ष
योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र राज्य
खर्चाचे अंदाजपत्रक :
- विहीर – 3 लाख रुपये
- 5 एचपी सोलर पंप पॅनल – 3,25000
- योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा : विहीर – संबंधित प्रकल्प अधिकारी
- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि कृषी विभाग
- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
- ग्रामीण पाणीपुरवठा आणि इतर शासकीय योजना. Navin Vihir Khodkam Anudan 2024
लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- वन हक्क कायद्याद्वारे वरील पट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र
- सोलर पंप मिळवण्यासाठी जलस्त्रोत उपलब्ध असल्याचा दाखला
- यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र
- ज्या ठिकाणी विहीर खोदणे प्रस्तावित आहे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे प्रमाणपत्र