शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी !! पिकांच्या नुकसानी पोटी मिळणार 596 कोटी रुपयांचे अनुदान : Nuksan bharpai 2024

Nuksan bharpai 2024 : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले होते . या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे . तसेच शेतकऱ्यांना आपले कुटुंब व्यवस्थापन सुरळीत चालवावे व आपल्या कुटुंबाला पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली आहे . दरम्यान कोणत्या विभागात नुकसान झालेले आहे. आणि किती मदत मिळणार आहे याबद्दल आपण लेखांमध्ये माहिती जाणून घेणार आहोत .

Nuksan bharpai 2024

Nuksan bharpai 2024 : विविध संकटांमुळे शेतकरी सातत्याने चिंतेत…

विविध संकटांमुळे बळीराजा सातत्याने चिंतेत आहे अधिक अस्मानी संकट येतं तर कधी सुलतानी संकटे तर कधी दुष्काळ असतो . तर कधी अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. परिणामी हाती आलेले पीक वाया जातात . यावर्षी राज्यात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत होता . यात मोठा फटका शेती पिकांना बसला होता . शेतकऱ्यांची उभी पीक आडवी झालेली होती . याचा मोठा आर्थिक फटका म्हणजे शेतकऱ्यांना बसला होता .यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली आहे .

Nuksan bharpai 2024

Nuksan bharpai 2024 : कोणत्या विभागात किती आर्थिक मदत मिळणार आहे ?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार नाशिक विभागात 37 422 हेक्टर वरील पिकांना फटका बसलेला होता . 567 शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झालेलं आहे . सरकार कडून आता 108 कोटी 21 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेले आहे . तसेच अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी 382 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे . अमरावती विभागातील 2132 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते . या विभागात 1 लाख 38 हजार 253 हेक्टर वरील पिकांना फटका बसलेला होता नुकसान झालेले होते . तर नागपूर विभागातील 54 हजार 756 शेतकऱ्यांच्या 1760 हेक्टर वरील पिकांना फटका बसलेला होता . यासाठी सरकारने 100 कोटी रुपयांची आर्थिक मदत केलेले आहे . तसेच पुणे विभागात 2296 शेतकऱ्यांचे 1657 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले होते .शेतकऱ्यांना 83 लाखाची मदत सरकारकडून मिळणार आहे . आणि नागपूर मोती विभागातील शेतकऱ्यांना 482 कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली आहे येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाणार आहे .

नुकसान भरपाई बद्दल सरकारने कोणते निर्देश दिलेले आहेत ?

यादरम्यान नुकसान भरपाई पोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करू नये . असे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत .

शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती ! खरीप पिक विमा भरण्याची शेवटची तारीख आली जवळ; करा अर्ज..! 

Leave a Comment