शेतात जलद गतीने काम करण्यासाठी चार कामे एकावेळी करते हे पेरणी यंत्र; पहा संपूर्ण माहिती : Perani Yantra 2024

Perani Yantra 2024 सध्या हवामानामध्ये होत असलेले बदल यामध्ये पावसाचे आगमन वितरण तसेच निर्गमन या बदलांमुळे पिकांवरती किंवा जमिनीवरती बदल आढळून येत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण मशागती खाली सुमारे 80 टक्के क्षेत्र कोरडवाहू शेतीमध्ये येते. या सर्व हवामानाच्या बदलाचा परिणाम कोरडवाहू शेतीमध्ये झालेला दिसून येतो. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त जमीन ही कोरडवाहू शेतीमध्ये येते.

Perani Yantra 2024

Perani Yantra 2024यासाठी पावसाचे पडणारे पाणी आहे त्या ठिकाणी त्याची साठवणूक करून त्याचा पावसाच्या खंड काळामध्ये उपयोग करण्यात आवश्यक असते त्याचप्रमाणे अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण आणि तीव्रता याबरोबरच जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन विविध पिकांची लागवड करणे व रुंद वरंबा सरी पद्धतीने पिकांची लागवड केल्यामुळे शेती अगदी फायदेशीर ठरते. रुंद वरंबासरी कोरडवाहू शेतीसाठी उपयोगी तंत्रज्ञानामध्ये ही पद्धत अत्यंत उपयोगी असल्याचे मानले जाते. हवामानाच्या बदलानुसार तंत्रज्ञान ठरवले गेले आहे. तसेच स्तन उगवण्याच्या दृष्टीने तन उगवण्याच्या आधी आवश्यक असलेल्या कीटकनाशकांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

Perani Yantra 2024 यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी केंद्रीय कृषी कोरडवाहू संशोधन केंद्र हैदराबाद यांच्या चार फणी रुंद सरी वरंबा मध्ये बदल करून या पेरणी यंत्रामध्ये आता पाच फणी रुंद सरी वरंबा बियाणे खते तसेच पेरणी सह फवारणी व रासने यासाठी यंत्र विकसित केलेले आहे. यामध्ये ट्रॅक्टरच्या 3.1 ला पेरणी यंत्र जोडून पेरणी करत असताना पी टी ओ रिकामा असतो, याचा वापर करून फवारणी सोबत पेरणी सुलभतेने किंवा सोप्या पद्धतीने याची संरचना करता येते. (Perani Yantra 2024)

ट्रॅक्टरचलित पाच फणी यामध्ये पेरणी यंत्र यंत्राच्या माध्यमातून खालील प्रमाणे थोडा बदल करून कमी रुंदीचे टायर लावून तीन टप्प्यांमध्ये सोयाबीन आणि इतर पिकांमध्ये पेरणी पासून ते फवारणी पर्यंतचे सर्व कामे यांत्रिक पद्धतीने करता येऊ शकतात.

1 ) बीबीएफ पद्धतीने फवारणी , रासनी, पेरणी उगवण पूर्व :Perani Yantra 2024

  • Perani Yantra 2024 पारंपरिक शेती पद्धतीमध्ये शेतकरी त्याच्या शेतीमध्ये बियाणे खते पेरणी तसेच कीटकनाशके व तन नाशके यांची फवारणी याबरोबरच रास मी ही सर्व कामे ट्रॅक्टरने अथवा बैलांच्या सहाय्याने करतात. यासाठी शेतकऱ्यांना 30 ते 32 तास हेक्टरी लागतात. याबरोबरच मजुरांवरील आणि यंत्रांचा खर्च जास्त प्रमाणात होतो. याच्या तुलनेत ट्रॅक्टर चालत एकाच फ्रेम वरती पाच ओळीचे बीबीएफ यामध्ये पेरणी रासनी आणि फवारणी यंत्र विकसित केलेले आहे.
  • या सर्वामुळे शेतकऱ्यांना आता रुंद व रंगावरती पेरणी करणे खते देणे तन नाशक फवारणी करणे याबरोबरच रासायनिक करणे ही चारही कामे आता एकाच वेळी करता येऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांचा होणारा खर्च याबरोबरच वेळेची बचत सुद्धा होणार आहे तसेच ट्रॅक्टर हे शेतामध्ये एकदाच गेल्यामुळे माती वरती दाब सुद्धा कमी प्रमाणात पडणार आहे.
  • यामध्ये असलेल्या सरी यंत्रामुळे आवश्यक प्रकारे वाफे तयार करता येऊ शकतात. यावरती शास्त्रीय पद्धतीने पेरणी करून तणनाशक फवारणी च्या माध्यमातून तणांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात होणार आहे. तसेच वाक्यांची निर्मिती झाल्यामुळे जर पावसाचे पाणी वाफ्यांमध्ये साचून राहिले तर किंवा पावसाचे पाणी अधिक पडले तर वाफेंद्वारे हे पाणी वाहून जाऊ शकते तसेच कमी पाऊस पडला तर जमिनीमध्ये असलेला ओलावा टिकून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते त्यामुळे आहे त्या ठिकाणी पाण्याचे जलसंवर्धन होऊन त्या ठिकाणी असलेल्या पिकांना तसेच पुढील हंगामामधील पिकांना याचा फायदा होणार आहे.
  • विशेषतः दीर्घकालीन जर पाऊस पडला नाही तर याचा लाभ होतो व त्याची तीव्रता सुद्धा कमी होते. गादीवाफे किंवा वाऱ्यांमध्ये हवा खेळती राहू शकते, पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण राखण्यास मदत होते. त्यामुळे बियाणे चांगल्या प्रकारे उगवतात व त्यांची वाढ सुद्धा जोरदार होते.
  • या यंत्राच्या सहाय्याने चारही कामे एकाच वेळेस होत असल्यामुळे ट्रॅक्टर सतत शेतामध्ये जाऊन माती वरती पडणारा दाब कमी होणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होण्यास मदत होणार आहे

Perani Yantra 2024

2 ) ट्रॅक्टर चलीत कोळपणी सरी यंत्र कमी रुंदीच्या टायर सह :(Perani Yantra 2024)

  • चार इन एक यंत्राचे पेरणी डबे बाजूला काढून ठेवून याच यंत्राच्या साहाय्याने एकाच वेळी करणे गरजेचे असेल तर फवारणी तसेच सर्व मोकळा करता येऊ शकतात हे सर्व कामे एकावेळी करता येतात. यासाठी ट्रॅक्टरला कमी रुंदीचे टायर बसवणे गरजेचे असते.
  • ट्रॅक्टर खरेदी करत असताना टायर रुंद किंवा मोठे असतात. आणि ते शेत तयार करण्यासाठी किंवा जास्त ताकदीच्या लागणाऱ्या कामासाठी कामांमध्ये येतात. परंतु ज्यावेळी पेरणी आणि मुख्यतः कोळपणी फवारणी अशी कामे करणे गरजेचे असते त्यावेळी जर मोठे टायर वापरले तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि शेत देखील जास्त प्रमाणात दाबल्या गेल्याने त्याचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.
  • हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टर उपलब्ध असूनही कोळपणी आणि फवारणीची कामे मजुरांच्या सहाय्याने करून घेतात. या कामासाठी शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागतो आणि शेतकऱ्यांचे मग आर्थिक गणित बिघडते.
  • कोळपणी आणि फवारणी यांसारखी कामे वेळेवर ती करणे आवश्यक असते आणि बरोबर त्याच वेळेस मजूर वेळेवर ती उपलब्ध होत नाही. त्यामुळे एकतर पावसाचे दिवस सुरू असतात यामध्ये वातावरणामुळे पिकांवर ते विविध रोग पडण्याची दाट शक्यता असते. अशा सर्व परिस्थितीमध्ये हे सर्व कामे करण्याची धावपळ सुरू असते तसेच ही सर्व कामे पूर्ण होणे शक्य नसते.

Perani Yantra 2024 वरील सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याकडे जर ट्रॅक्टर उपलब्ध असेल तर या ट्रॅक्टरला कमी रुंदीचे टायर बसवणे आवश्यक आहे. ज्यामुळे कोळपणी फवारणी या प्रकारची सर्व कामे तुम्हाला यांत्रिक पद्धतीने तसेच वेळेवर ती करणे किंवा वेळेच्या आत करणे शक्य होऊ शकते. त्यामुळे कमी रुंदीची टायर खरेदी करताना ट्रॅक्टर ला बसेल असे टायर रिम सोबत खरेदी करायचा आहे.

3 ) ट्रॅक्टर चलीत फवारणी

Perani Yantra 2024 ट्रॅक्टर चलीत फवारणी या यंत्राच्या माध्यमातून कीटकनाशके तसेच तन नाशक हे पीक उगवण्याआधी किंवा नंतर या तणनाशकांची फवारणी करता येऊ शकते. फवारणी करत असताना पेरणी यंत्र बाजूला काढून ठेवता येऊ शकते आणि पाहिजे ते कीटकनाशक फवारणी करू शकतो. या यंत्राच्या साहाय्याने एकसारखी फवारणी करता येते. फवारणी यंत्राच्या सहा मीटर बूम वर 12 नोझल असून ते पिकांमधील दोन ओळीतील अंतरानुसार हवे असल्यास कमी अधिक अंतरावरती बसवता येऊ शकते .या यंत्राच्या सहाय्याने एक हेक्टर क्षेत्र फवारणी होते.(Perani Yantra 2024)

 Perani Yantra 2024

(Perani Yantra 2024) प्रमुख फायदे

  • फनातील अंतर बदलणे शक्य होते
  • वाफे पद्धतीचा वापर करणे
  • पेरणी सोबत तणनाशकांची फवारणी करता येते
  • वेळेमध्ये आणि खर्चामध्ये ३० ते ४० टक्के बचत होते
  • कार्यक्षमता 1.5 एकर प्रति तास
  • उत्पन्नामध्ये वीस ते तीस टक्के वाढ
  • बियाणे व खतांमध्ये 15 ते 20 टक्के बचत
  • तण काढणे आणि खर्चामध्ये 20 टक्के बचत
  • फवारणी साऱ्या मोकळा करणे कोळपणी दुसऱ्या टप्प्यातील कामे एकाच वेळेस करता येऊ शकतात
  • फवारणी करता सुद्धा वापरता येते (6 मीटर )

दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क देण्यास 3 कोटी 70 लाख रुपये वितरित

याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा : Video Credit VISION VARTA

FAQ :

ट्रॅक्टर चलीत फवारणी कशी करावी ?

ट्रॅक्टर चलीत फवारणी या यंत्राच्या माध्यमातून कीटकनाशके तसेच तन नाशक हे पीक उगवण्याआधी किंवा नंतर या तणनाशकांची फवारणी करता येऊ शकते

ट्रॅक्टरचलित कोळपणी सरी यंत्र कमी रुंदीच्या टायर सह कशी करावी ?

ट्रॅक्टर उपलब्ध असेल तर या ट्रॅक्टरला कमी रुंदीचे टायर बसवणे आवश्यक आहे. ज्यामुळे कोळपणी फवारणी या प्रकारची सर्व कामे तुम्हाला यांत्रिक पद्धतीने तसेच वेळेवर ती करणे किंवा वेळेच्या आत करणे शक्य होऊ शकते.

Leave a Comment