Pm Kisan and Namo Samman Nidhi Yojana 2024 : प्रधानमंत्री किसान महोत्सव नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आलेले आहे. यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली असेल .तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे .तसेच प्रधानमंत्री किसान साठी नोंदणी करत असताना पती-पत्नी मुलांच्या आधार कार्ड जोडावे लागणार आहे. सातबारावर नाव असणाऱ्या एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री किसान व नमो सन्मान निधी योजनेसाठी कोणते नियम लागू केलेले आहे ?
- शासनाच्या नव्या नियमानुसार नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे केंद्र सरकारने 2019 मधील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेले आहे .
- या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात. तसेच आता महाराष्ट्र शासनाने ही नमो सन्मान योजना लागू केलेले आहे. राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळणार आहेत .
- या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर अठरा वर्षावरील मुलांना लाभ घेता येतो पण काही पती-पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर झालेले असेल .
- तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती-पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याने शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.Pm Kisan and Namo Samman Nidhi Yojana 2024
प्रधानमंत्री किसान व नमो सन्मान निधी योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही ?
Pm Kisan and Namo Samman Nidhi Yojana 2024 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल .त्या पती पत्नी पैकी एकच या योजनेसाठी पात्र असतील शिवाय सरकारी अथवा निमसरकारी नोकरीस असलेले अथवा कर भरत असलेले तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्याची स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे एखाद्या शेतकऱ्याकडे जमीन नसेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात !! असे तपासा यादीमध्ये नाव