शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप नवीन अर्ज सुरू ; असा करा अर्ज : Saur Krushi Pump Yojana 2024

Saur Krushi Pump Yojana 2024 जे शेतकरी सौर पंपाच्या योजनेपासून वंचित राहिले होते त्यांच्या समस्येचे समाधान महाराष्ट्र सरकारने केले आहे राज्य सरकारने नवीन सौर कृषी पंप योजना सुरू केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौरऊर्जा वापरता येणार आहे ही योजना महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी शाश्वत ऊर्जा पुरवठा मिळण्यासाठी मदत करणार आहे यासाठी राज्य सरकारने नव्या पोर्टल ची सुरुवात केली असून शेतकरी या पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

Saur Krushi Pump Yojana 2024

या योजनेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथे करण्यात आले आहे यावेळी शेतकऱ्यांसाठी नवीन पोर्टल आणि माहिती पुस्तके चे अनावरण सुद्धा करण्यात आले आहे या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहज पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची आणि शाश्वत ऊर्जा मिळणार आहे शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ घेण्यासाठी फक्त 10% रक्कम भरावी लागणार आहे.

तर उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी फक्त 5% रक्कम भरावी लागणार आहे ही एक महत्त्वाची अशी योजना आहे.

Saur Krushi Pump Yojana 2024 या योजनेसाठी पात्रता :

सौर कृषी पंप योजना सर्वसाधारण गटांमधील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेमधून शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र आणि शाश्वत ऊर्जा स्त्रोत मिळणार आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन ते साडेसात अश्वशक्तीच्या पंपाची मागणी करावी लागणार आहे.

तसेच शेतकऱ्यांना पाच वर्षाची दुरुस्ती सेवा आणि हमी देखील मिळणार आहे सौर पंपावर विजेची समस्या आणि लोडशेडिंगच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे.

कृषी पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

Saur Krushi Pump Yojana 2024 13 सप्टेंबर 2024 पासून नवीन पोर्टल सुरू केले आहे kusum solar या पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे तर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी लाभार्थी सुविधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर अर्जाचा फॉर्म भरून सबमिट करावा लागणार आहे या पोर्टल अंतर्गत अर्ज करणे खूप सोपे आहे आणि शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज सुद्धा राहणार नाही.

राज्य सरकारकडून मिळाली महामेष अनुदान योजनेस मान्यता

Leave a Comment