शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; नव्या विहिरींना चार लाख, तर जुन्या दुरुस्ती 1 लाख अनुदान मिळणार : Vihir Anudan 2024

Vihir Anudan 2024 राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे त्यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विहिरी, शेततळे, विज जोडणी साठी भरीव अनुदान दिले जाणार आहे.

Vihir Anudan 2024

राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्याचा निर्णय आज मंत्री मंडळ बैठकीमध्ये घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर शेततळे वीज जोडणीसाठी परिवहनुदान दिले जाणार आहे आधार सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपये पर्यंतचे अनुदान तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि 50000 असे होते.

Vihir Anudan 2024 शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारची मोठी घोषणा :

इनवेल बोरिंग साठी आता चाळीस हजार तसेच यंत्रसामग्रीसाठी पन्नास हजार रुपये आणि परसबागेसाठी पाच हजार देण्यात येणार आहेत नवीन विहिरीन बद्दल बारा मीटर खोलीची अट रद्द करण्यात आली आहे तसेच दोन विहिरींमधील 500 फूट अंतराची अट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या एक लाख रुपये अनुदान दिले जाते आताही प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा दोन लाख यापैकी जे कमी असेल ते दिले जाणार आहे.

Vihir Anudan 2024 याप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या पंचवीस हजार रुपये दिले जाते आता तुषार सिंचन संच 47 हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के अनुदानापैकीचे कमी असेल ते अनुदान दिले जाणार आहे अशाप्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प अत्यल्प आणि बहुभूधारकांना 97 हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या 90% चे कमी असेल ते अनुदान दिले जाणार आहे शिवाय इतरही अनेक निकषांमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री योजना दूतसाठी अर्ज कसा करावा ?

Leave a Comment